माॅर्निंग वाॅकची प्रेरणा

    11-Dec-2024
Total Views |
 

thoughts 
 
पाकिस्तानबद्दल एरवी आपल्याकडे फार नफरत. पण, पाकिस्तानचा उल्लेख जिथे पापस्थान हाेताे, अशा व्हाॅट्सअप ग्रुपांमधले रिकामटेकडे फाॅरवर्डे काका लाेकही ही पाेस्ट पाहिल्यावर मात्र उत्साहित झाले असतील.त्यांच्याकडे काकू देखील बघत नसली (तिला तिच्या व्हाॅटसअप ग्रुपांमध्ये आयटी सेलचा कचरा फाॅरवर्ड करण्याचं देशकार्य करण्यातून फुरसत कुठून मिळायला) आपण वाॅकवर गेलाे आहाेत आणि आपल्या बाबतीतही असा गुलाबी याेगायाेग जुळून आला आहे, अशी स्वप्नं या काकांना पडूलागली असणार.इथे पाकिस्तानात जाे काही विवाह जुळून आलाय, त्याला एरवी जरठ-बाला विवाह म्हणतात.
 
आईवडिलांनी एखाद्या 19 वर्षांच्या मुलीचं लग्न 70 वर्षांच्या म्हाताऱ्याबराेबर लावून दिलं तर ताे जुलूम असताे. पण, मुलगी आजाेबांच्या प्रेमात पडली असेल, तर प्रेम आंधळं असतं, यापलीकडे काय म्हणणार! या मुलीच्या बाबतीत प्रेम बहिरं असतं, असंही म्हणायचा स्काेप आहे म्हणा! कारण काका माॅर्निंग वाॅकला मस्त गाणी गात चालायचे आणि त्या गाण्यांमधून या मुलीला असा शाेध लागला की काका मनाने फार तरुण आहेत. त्यामुळे तिने त्यांच्यावर जीव जडवला. हे वाचल्यावर किती काका स्पाेर्ट्स शूज घालून सकाळी आणि संध्याकाळीही वाॅक करायला तयार झाले असतील ना! या युवतीने काकांचा बँक बॅलन्सही जाणून घेतला असेल काय?