महाराष्ट्र असीमित ताकदीचे राज्य; पण थांबू नका!

    11-Dec-2024
Total Views |
 
 

CM 
महाराष्ट्र हे असीमित ताकदीचे राज्य आहे.आता आपण क्रमांक एकवर आहाेत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला. जुनी पुण्याई असली, तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे, असे सांगतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पायाभूत सुविधांप्रमाणेच राज्य सरकारच्या फ्लॅगशिप याेजनांसाठीही स्वतंत्र वाॅररूम सुरू करण्याचे निर्देश यावेळी दिले. विधान भवनातील समिती सभागृहात मुख्यमंत्र्यांनी अतिर्नित मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी वरीष्ठ अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्य सरकारच्या आगामी काळातील वाटचालीची दिशा केली स्पष्ट केली.पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकता यावर अधिक भर द्या, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या सहकार्याचा राज्याच्या प्रगतीसाठी पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे.
 
यासाठी अधिक समन्वय, पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा. याकरिता नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून व्यवस्था उभी करा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक वाॅररूम पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेच. ही वाॅररूम आणखी कार्यक्षम करा. काेणते प्रकल्प त्यात असले पाहिजेत, याची मुख्य सचिवांनी नव्याने रचना करावी. या धर्तीवर राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशिप याेजनांसाठीही दुसरी वाॅररूम आता असेल. त्यातून सर्वसामान्य लाेकांपर्यंत लाभ गतीने पाेहाेचले पाहिजेत यासाठी प्रयत्न करता येतील. जनता दरबार, लाेकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्या. हे कार्यक्रम सुरू झालेच पाहिजे, ते तळागाळात नेले पाहिजेत. आपले सरकार पाेर्टल पुन्हा नव्याने पूर्ण क्षमतेने चालविण्यात यावे.जिल्ह्यांच्या पालक सचिवांनी आपापल्या जिल्ह्यांचे तातडीने दाैरे सुरू करावेत. पालक सचिवांनी आपल्या अनुभवाचा फायदा त्या-त्या जिल्ह्यांना करून देण्यावर भर द्यावा. वेगवेगळ्या विभागांचे पाेर्टल अपडेट करा.
 
ते अधिक प्रभावी करा. त्यातून लाेकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या कशा मिळतील यावर भर दिला पाहिजे.अर्थातच, यात उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित करण्यात येईल.राज्य शासनाची सर्व संकेतस्थळे ही आरटीआय फ्रेंडली करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.ते म्हणाले की, इज ऑफ लिव्हिंगवर सर्वाधिक भर द्या. राज्यभरातून नागरिक सर्वाधिक काेणत्या कारणासाठी आपल्याकडे येतात आणि त्यांना त्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर देण्यासाठीचे नियाेजन करावे.
यासाठी सहा-सहा महिन्यांचे दाेन टप्पे करून उद्दिष्ट गाठता येईल. यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घेता येईल. त्यासाठी त्यांची एक समिती गठित करून अभ्यास अहवाल तयार करण्यात यावा. कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. त्यांचा थेट सचिवांशी संवाद व्हावा आणि त्यातून त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे. नवीन नियु्नत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयाेजित करणे आवश्यक आहे.