चि. शुभम - चि.सौ.कां. अमृता
बावधन, 28 नोव्हेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
पुणे महानगरपालिकेचे सुपरिटेंडेट इंजिनीअर श्री. साहेबराव बलभीम दांडगे व सौ. सुवर्णा यांचे सुपुत्र चि. शुभम यांचा शुभविवाह नांदेडमधील प्रतिष्ठित रहिवासी श्री. अंकुशराव लक्ष्मणराव डोंगरे-पाटील व सौ. माधुरी यांची सुकन्या चि.सौ. कां. अमृता सोबत बुधवार 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी बावधनमधील मुहूर्त लॉन्समध्ये आयोजित भव्य सोहळ्यात संपन्न झाला. नवदांपत्यास शुभाशीर्वाद देण्यासाठी पुणे आणि नांदेड शहरातील उद्योग, व्यापार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, तसेच पुणे मनपाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.