आंचल मोरे हिची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

    29-Nov-2024
Total Views |
 
 
ac
 
तळेगाव दाभाडे, 28 नोव्हेंबर (आ.प्र.) :
 
कोल्हापूर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय ज्युनिअर फुटबॉल स्पर्धेसाठी मावळ तालुक्यातील आंचल अशोक मोरे हिची निवड झाली आहे. चौदा वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारी ती मावळ तालुक्यातील पहिली फुटबॉलपटू ठरली आहे. मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या आंचलकडून स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असून, तिच्या यशामुळे महिला खेळाडूंना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास रायन स्पोर्ट्‌‍स क्लबच्या सचिव मार्गारेट स्वामी यांनी व्यक्त केला आहे.
 
ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या आंचलने नुकत्याच वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड स्पर्धेत पुणे विभागाचे प्रतिनिधित्व केले. तिच्या चमकदार खेळाची दखल घेत जिल्हा क्रीडा संचालकांच्या समितीने तिची राष्ट्रीय संघात निवड केली, अशी माहिती तिचे मुख्य कोच मनोज स्वामी यांनी दिली. मंगळवारी ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलचे विश्वस्त साहेबराव बोडके, मुख्याध्यापक विजिला राजकुमार आणि रायन स्पोर्ट्‌‍स अकादमीच्या सचिव मार्गारेट स्वामी यांनी तिचा सत्कार केला. राष्ट्रीय खेळाडू विजयकुमार चेन्नय्या, विक्की हुन्नूर आणि मुख्य कोच मनोज स्वामी यांच्या उपस्थितीत आंचलला शुभेच्छा देण्यात आल्या.