फाेटाेग्राफीसाठी हाेताेय ड्राेनचा उपयाेग

    26-Nov-2024
Total Views |
 
 

camera 
एक बलूनिस्ट आणि फाेटाेग्राफरच्या हवेत फाेटाे घेण्याच्या इच्छेतून जन्माला आले हाेते, एरियल फाेटाेग्राफीचे तंत्रज्ञान. हे आधी सैन्याच्या सेवेच्या दृष्टीने विकसित झाले हाेते. मग फाेटाेग्राफीतील डेटा संग्रहित करणे, शाेध आणि सुटका, शेती, रिअल इस्टेट अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्राेन माेठ्या चर्चेचा विषय झाला आहे.बलूनपासून सुरू झाला प्रवास ड्राेन तंत्रज्ञानामध्ये एक उडणारे मशीन असते. ते मानवी रिमाेटच्या इशाऱ्यांनुसार आकाशात उंचीवर राहून फाेटाे आणि व्हिडिओ घेऊ शकते. म्हणून त्याला ‘अनमॅन्ड एरियल व्हीकल’ सुद्धा म्हटले जाते.ड्राेन फाेटाेग्राफी जमिनीवरून कॅच केलेल्या एका सर्वसाधारण फाेटाेपेक्षा अगदी नवीन दृष्टीकाेन समाेर ठेवते. या तंत्रज्ञानाने एक माेठा प्रवास केला आहे.
 
गॅसपार्ड-फेल्निस टूरनाचाेन, ज्यांना नादरच्या नावाने ओळखले जाते, ते 19 व्या शतकातील एक फ्रेंच फाेटाेग्राफर झाले. ते व्यंगचित्रकार आणि बलूनिस्ट सुद्धा हाेते. आपल्या वेगवेगळ्या छंदांना एका धाग्यात विणण्यासाठी त्यांना हवेत फाेटाेग्राफीचा विचार सुचला.सन 1858 मध्ये त्यांनी बलूनच्या मदतीने त्यांनी याचा एक यशस्वी प्रयत्न सुद्धा केला. तथापि, आज ते फाेटाे आपल्यासमाेर नाहीत. पण हवाई फाेटाेग्राफी सारख्या नवीन परिमाणाला उंची याच वळणावरून मिळाली हाेती. 20 व्या शतकात ‘न्यू व्हिजन’ आंदाेलनाबराेबर या विचाराला आणखी प्राेत्साहन मिळाले आणि हवाई फाेटाेग्राफीचा विषय पुढे आला.अपारंपारिक आहे पद्धत ड्राेन तंत्रज्ञान फाेटाेग्राफर्सना एका अशा उंची आणिकाेनापर्यंत पाेहाेचण्याची अनुमती देते, जी पारंपरिक फाेटाेग्राफी पद्धतींनी अश्नय किंवा अतिशय अवघड आहे.
 
एरिअल फाेटाेग्राफीतील कठाेर मेहनत, जास्त किंमत आणि हवामानातील समस्यांवर सरळ उत्तर देऊन या लहान उपकरणाने फाेटाेग्राफीच्या क्षेत्रातील प्रतिमा बदलली आहे. त्याचप्रमाणे ड्राेनने घेतलेले हवाई फाेटाे दुसऱ्या काेणत्याही पर्यायाच्या तुलनेत जास्त स्पष्ट आणि मनाेरंजक असतात. ड्राेनचे अनेक प्रकार आज आपल्या समाेर आहेत. काही ड्राेन कॅमेरा हायर इमेज ्नवालिटी पाहता, लार्ज इमेज सेंसर्स आणि अ‍ॅडजेस्टेबल एपर्चर बराेबर येतात. काही टेलिफाेटाे कॅमेरेही आहेत.त्यांच्यात ड्यूल आणि ट्राय कॅमेरा अ‍ॅडजेस्टमेंट्स संलग्न आहेत. काही ड्राेन्स 250 ग्रॅम पर्यंत हलके सुद्धा असतात. पण एका सामान्य, फ्रेंडली आकाराच्या ड्राेनचे फायदे जास्त आहेत. सर्वसाधारणपणे सांगायचे तर तुम्ही आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार सुरुवातीपासून ते बेस्ट एफपीव्ही ड्राेन्स पर्यंत निवडू शकता.