तेलंगणाचे राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांनी खडकवासल्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीस (एनडीए) नुकतीच भेट देऊन संस्थेतील विविध सुविधांची पाहणी केली.प्रबाेधिनीच्या प्रमुखांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यपालांचे स्वागत केले. हवाई दल, नाैदल व लष्कर या तिन्ही दलांच्या छात्रांच्या प्रशिक्षणासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध सुविधांची राज्यपालांनी बारकाईने पाहणी करत माहिती घेतली.प्रबाेधिनीतील शिस्त, नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी घेतले जाणारे परिश्रम, लष्करी नेतृत्व घडवण्यासाठी प्रबाेधिनीने विकसित केलेल्या सर्व सुविधा उत्तम दर्जाच्या असल्याचे सांगत राज्यपालांनी याबाबत समाधान व्य्नत केले.