ऑनलाइन कपडे खरेदी एवढीही कठीण नाही

    29-Oct-2024
Total Views |
 
 

online 
आजही अनेकजण ऑनलाइन कपडे खरेदी करायला बिचकतात. त्यातही महिला जास्त बिचकतात कारण एखादा ड्रेस त्यांना फिट हाेताे की नाही याची त्यांना भीती असते.बाजारात कपडे खरेदी करताना ट्रायलची साेय असते पण ऑनलाइन शाॅपिंगमध्ये अंदाजपंचेच काम करावे लागते.अशावेळी आपण आपले माप घेऊन ठेवून आपल्यासाठी साइजची निवड करावी.
 
मदत घ्या साइज चार्टचीही : काेणत्याही शाॅपिंग पाेर्टलवर जेव्हा आपण एखादा ड्रेस पसंत करता तेव्हा त्याच्यासाेबत साइज चार्टही स्क्रीनवर दाखवला जाताे. जर आपण आपले माप आधीच घेतलेले असेल तर ताे साइज चार्ट पाहून सहजतेने हे कळू शकेल की, काेणत्या साइजचा ड्रेस आपल्याल फिट बसेल. बहुतेक ब्रँड्समध्ये स्माॅल, मीडियम, लार्ज वा ए्नस्ट्रा लार्ज साइजचे माप जवळपास एकसारखेच असते. एखाद्या ब्रँडचे माप जर वेगळे असेल तर ही गाेष्ट नाेटच्या रूपात लिहिलेली असते. ज्यानुसार आपण याेग्य माप निवडू शकता.
 
फॅब्रिक ओळखणे : ऑनलाइन खरेदीत कपडा हातात घेऊन तपासता येत नसताे. यामुळे या काळात लाेकांना बहुधा कटू अनुभवही येतात. कारण ते फॅब्रिक न पाहता फक्त डिझाइन, प्रिंट इ. पाहूनच ऑर्डर देतात. अशावेळी एखादा ड्रेस पसंत पडल्यानंतर त्याविषयी दिलेली सारी माहिती प्रथम लक्षपूर्वक वाचावी. उदा. त्याचे फॅब्रिक काय आहे? वापरण्याबाबतच्या सूचना इ.
 
रिव्ह्यू अवश्य वाचा : शाॅपिंग साइट्सवर खरेदी करणारे लाेक आपल्या शाॅपिंगचे अनुभवही सांगत असतात. जे खूपच उपयुक्त असतात. या रिव्ह्यूजमध्ये ड्रेसेजचे फॅब्रिक, साइज, रंग, फिट व गुणवत्तेविषयी ग्राहकांच्या कमेंट्स वाचायला मिळतात. आता या प्रतिक्रिया वाचल्यानंतर आपण आपल्या याेग्य ऑनलाइन खरेदीचा किती याेग्य अंदाज लावू शकता हे आपल्या हुशारीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ अत्यंत खराब रिव्ह्यूजचे ड्रेसेस खरेदी करणे टाळावे. भले त्यांचे फाेटाे व पॅकेजिंग कितीही आकर्षक असले तरी. यासाेबतच रिटर्न पाॅलिसीचे नियमही वाचायला हवेत. कारण काही उत्पादने न आवडल्यास परत करता येतात पण काही उत्पादने एकदा खरेदी केल्यानंतर परत करता येत नाहीत.