वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन दिवाळीचा आनंदी द्विगुणित करा

    28-Oct-2024
Total Views |
 

diwali 
 
सणासुदीच्या निमित्ताने उत्साहाने आणि आनंदाने भेटीगाठी हाेत असतात.जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र असते तेव्हा सणाची खरी मजा येते. दिवाळी हाही सर्व कुटुंबीयांना एकत्र येऊन गप्पागाेष्टी करीत आनंद साजरा करावयाचाच सण आहे. सामान्य दिवसांत माणसाला एकटेपणाची सवय हाेते पण जेव्हा सण येताे तेव्हा हा एकाकीपणा खटकू लागताे.हा एकाकीपणा दूर करण्यासाठी ताे सारे काही विसरून आपल्या कुटुंबाकडे जाताे.विभ्नत कुटुंबप्रणालीने लाेकांमध्ये भलेही दुरावा निर्माण केला असला तरी हा दुरावा तेव्हा दूर हाेताे जेव्हा दिवाळीला कुटुंबातील सारेएकाच छताखाली गाेळा हाेतात. तेव्हा या सणाची मजा आणखी वाढत जाते.आजी-आजाेबांचे डाेळे केव्हापासून आपल्या नातवंडांना पाहण्यासाठी आतुरलेले असतात.
 
दिवाळीचा हा सण लक्ष्मीच्या आगमनासाेबतच प्रत्येक चेहऱ्यावर हास्य फुलवत असताे. सर्वांची प्रतीक्षा संपुष्टात येते आणिमिळूनमिसळून सारे कुटुंब या सणाच्या रंगात रंगून जाते. प्रत्येक घर दिव्यांच्या राेषणाईने दिपून जाते व सर्वांच्याच जीवनात प्रकाश पसरताे.श्रीमंत असाे वा गरीब प्रत्येकजण या सणाचा पुरेपूर आनंद लुटत असताे.सुखसमृद्धीच्या कामनेसह लक्ष्मीपूजन केले जाते. यामध्ये घरातील लक्ष्मी(महिला)ही भाग घेतात. त्यानंतर भेटीगाठी सुरू हाेतात.संस्कार पाळत वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन नात्यांच्या धाग्यांना मजबूत केले जाते.संस्कारांचे पालन केल्यामुळे हा सण नाती सुदृढ व प्रगाढ बनवताे. आशा आहे की, ही दिवाळी आपल्या कुटुंबातही आनंदाचा उल्हास घेऊन येईल.