अलिकडेच,इंडियन जर्नल ऑफ प्रायव्हेट सायकेटरीमध्ये प्रकाशित झालेल्या अ नॅचरलिस्टीक स्टडी ऑफ ऑब्सेसिव्ह -कम्पल्सिव्ह डिसऑर्डर च्या अभ्यासानुसार जउऊ हा एक जुनाट विकार आहे.हे युराेप आणि उत्तर अमेरिकेतील 2-3%लाेकांमध्ये दिसून येताे. भारतीय लाेकांमध्ये ही संख्या 0.6 % आणि 0.76% च्या दरम्यान आहे. त्याचा दर खूप कमी आहे याचे कारण बहुतेक ओसीडी रुग्ण त्यांच्या समस्या सांगत नाहीत.त्याना ते लपवून ठेवायचे आहें.एका रिपाेर्टनुसार नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ मेंटल हेल्थच्या अभ्यासात असे दिसून आले आहें की गेल्या वर्षी अंदाजे 1.2% अमेरिकन लाेकांना जउऊ चा त्रास झाला हाेता.ज्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त हाेती.
0.5%पुरुषांना या समस्येने ग्रासले हाेते, तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण 1.8% हाेते. जउऊ ची लक्षणे दिेसली तर सर्वप्रथम तुमच्या स्वास्थ्याचे निरीक्षण करा. मनाेचिकित्सक किंवा चिकित्सक सारख्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या विचार किंवा वर्तनाला कसे ओळखावे, हे शिकणे महत्त्वाचे आहें. तज्ज्ञ तुम्हाला ह्या पद्धती सांगू शकतील कारण ते तुमची स्थिती बघून उपचार करतील.ज्यामुळे तुम्ही अस्वस्थता अनुभवणार नाही.ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर हे बऱ्याच कालावधीपासूनचा त्रास आहें.त्यात व्य्नती विचारांवर वारंवार नियंत्रण ठेवू शकत नाही.बऱ्याच वेळा ताे स्वतःच त्याच्या वृत्तीमुळे अस्वस्थ किंवा चिंताग्रस्त असताे.