एनएमएमटी नियंत्रण कक्ष, परिसराची सेवा ही स्वच्छता मोहिमेत साफसफाई

    01-Oct-2024
Total Views |
 
 
nm
 
नवी मुंबई, 30 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
स्वच्छता ही सेवा मोहीम-2024 अंतर्गत नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) बस आगारे, नियंत्रण कक्ष व परिवहन मुख्यालय कचरामुक्त करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नेरूळ, बेलापूर, ऐरोली, वाशी, कोपरखैरणे, सीबीडी, सारसोळे, घणसोली, घरोंदा; तसेच वाशी सेक्टर 7 बस स्थानक अशा 10 ठिकाणी अंतर्गत व परिसर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
 
या मोहिमेत नियंत्रण कक्षांचा परिसर, इमारत व बसथांबे स्वच्छ करण्यात आले. या मोहिमेत एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडुसकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, रा. फ. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक; तसेच परिवहन उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी, एनएसएसचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.