दै. ‌‘संध्यानंद'चे वरिष्ठ उपसंपादक जनार्दन पाटील यांचे दु:खद निधन

04 Jan 2024 15:47:56
 
e
 
चऱ्होली, 3 जानेवारी (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
दै. आज का आनंद तसेच दै. संध्यानंदचे वरिष्ठ उपसंपादक श्री. जनार्दन वामनराव पाटील यांचे बुधवार दि. 3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता हार्ट ॲटॅकमुळे निधन झाले. त्यांचे वय 71 वर्षे होते. ते मागील 35 वर्षांपासून दै. आज का आनंदशी जोडलेले होते. ते अंतिम दिवसापर्यंत कार्यरत होते. स्व. जनार्दन पाटील यांच्या मागे पत्नी सिंधू पाटील, मुलगे संदीप आणि दीपक असा परिवार आहे. स्व. पाटील दै. आज का आनंद कुटुंबातील सर्वात सीनियर सदस्यांपैकी एक होते आणि सर्व सहकाऱ्यांमध्ये ते मृदूभाषी आणि स्नेहपूर्ण व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते. गुरुवार, दि. 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता चऱ्होली स्मशानभूमीत स्व. पाटील यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.
Powered By Sangraha 9.0