आशियातील 7 काेटी लाेकांना काेराेना आणि महागाईचा फटका

    08-Sep-2023
Total Views |
 
 


inflation
 
 
 
काेराेना महामारी आणि जीवनमानाच्या वाढत्या खर्चामुळे आशियातील 7 काेटींपेक्षा जास्त लाेक गेल्या वर्षी अतिगरिबीत ढकलले गेले आहेत. आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) अहवालातील ही माहिती असून, ही गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्नांची गरज व्यक्त करण्यात आली आहे.जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड वगळता, आशिया खंड आणि त्यालगतचे बहुतेक देश विकसनशील आहेत. काेराेना महामारी आणि जीवनमानाच्या वाढत्या खर्चाचा फटका या प्रदेशातील सुमारे 15 काेटी 52 लाख लाेकांना बसला आहे. हे प्रमाण या प्रदेशातील एकूण लाेकसंख्येच्या 3.9 टक्के असून, हे लाेक गेल्या वर्षी अतिगरिबीत ढकलले गेले. 6 काेटी 78 लाख लाेकांना पुरेशी आराेग्यसेवा नाही आणि ते जीवनमानाच्या वाढत्या खर्चाशी झगडत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.विकसनशील आशियात 46 देशांच्या अर्थव्यवस्था येतात.
 
‘महामारीच्या फट्नयातून आशिया आणि प्रशांत विभागातील देश सावरत असले, तरी जीवनमानाच्या वाढत्या खर्चामुळे गरिबी निर्मूलनाचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत,’ असे ‘एडीबी’चे मुख्य अर्थतज्ज्ञ अल्बर्ट पार्क यांनी सांगितले.2017च्या अंदाजानुसार, दिवसाला 2.15 डाॅलरची (सुमारे 178.11 रुपये) कमाई म्हणजे आत्यंतिक गरिबी मानली जाते. आशियातील बहुतेक देशांत गेल्या वर्षी चलनवाढ झाली; तसेच सप्लाय चेनही विस्कळीत हाेऊन लाेकांना त्रास सहन करावा लागला. अन्न आणि इंधनावर जास्त खर्च करावा लागत असल्याने महागाईचा फटका गरिबांना सर्वाधिक बसताे. त्यामुळे आराेग्य आणि शिक्षणासारख्या महत्त्वाच्या बाबींसाठी पैसा साठविणे त्यांना अश्नय हाेत असल्याचे अल्बर्ट पार्क सांगतात.‘सामाजिक सुरक्षेचे जाळे अधिक व्यापक करणे आणि राेजगारवृद्धी करणारी गुंतवणूक करणे या दाेन उपायांतून यावर मार्ग काढता येईल,’ असे अल्बर्ट पार्क यांनी नमूद केले. जगातील गरिबांची सर्वाधिक संख्या आशिया आणि आफ्रिका खंडात आहे. काेराेना आणि चलनवाढ यांचा सर्वाधिक परिणाम या दाेन खंडात जाणवताे.