डाेकेदुखीची अशीही कारणे...

    08-Sep-2023
Total Views |
 

headache 
तंग कपडे - प्रमाणापेक्षा अधिक टाइट कपडे आणि बेल्ट यांचा सतत पाेटावर दबाव पडताे.ज्यामुळे डाे्नयामध्ये वेदना हाेऊ लागतात. अधिकवेळ पाेट आतमध्ये दाबून ठेवण्याने डाेकेदुखी हाेऊ लागते.
 
ब्रेन फ्रीज - कित्येकवेळा फार थंड आईस्क्रीम खाण्याने अथवा गाेठविलेले काेल्ड ड्रिंक पिण्याने डाेके दुखू लागल्यासारखे वाटते, यास ब्रेन फ्रीज म्हणतात. असे फार थंड खाण्याने अथवा पिण्याने हाेते.आपणास मायग्रेनची तक्रार असेल तर अशा थंड पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे.
 
गॅस्ट्राेनाॅमी - अधिक मिरची- मसालेदार पदार्थ खाण्याने, दाेन भाेजनात अधिक वेळाचे अंतर ठेवण्याने अथवा जंकफूडच्या अत्याधिक सेवनाने पाेटामध्ये आग हाेते आणि पाेटामध्ये गॅसेस हाेण्याची तक्रार हाेते.जे हळूहळू डाेकेदुखीचे रूप घेते.
 
तीव्र सुंगंध - घरातील एखादी व्य्नती सेंट लावत असेल तर त्यावेळी आपणास डाेकेदुखी जाणवत नाही, परंतु तीव्र सुगंधाने आपणास अ‍ॅलर्जी हाेऊ शकते. ज्याच्या कारणाने डाेकेदुखी हाेऊ लागते.
 
कॅफीनचा ओव्हर डाेस - कॅफीनची अधिकता ही डाेकेदुखीचे कारण बनते. काही खाण्याचे पदार्थ जसे पुडिंग आणि केक यांमध्ये इतके कॅफीन असते की जे खाण्याने डाेके दुखू लागते. काही पेय पदार्थ जसे काेक, काॅफी, लिकर, आणि चहा यांच्या सेवनानेही असे हाेऊ शकते.
 
वातावरण - कित्येकवेळा अचानक वातावरणात हाेणारे बदलाव जसे ह्यूमिडिटी, गरमी, थंड हवा या कारणांनेही डाेकेदुखी हाेते.