दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगाला मिळणार जगण्याचा आधार

    08-Sep-2023
Total Views |

 
 

disable 
दिव्यांग व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येत असून, त्यांचे काम प्रशंसनीय आहे. दिव्यांगांच्या अडीअडचणी साेडवण्यासाठीच दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली असून, या मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगास जगण्याचा आधार व बळ मिळेल, असा विश्वास दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांनी व्यक्त केला.शहरातील ठक्कर डाेम येथे आयाेजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी कार्यक्रमात कडू बाेलत हाेते.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डाॅ. अशाेक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीआशिमा मित्तल, मालेगावचे आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गाेसावी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व दिव्यांग बांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.जिल्हाधिकारी शर्मा यांनी प्रास्ताविक केले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक जिल्हा परिषद, नाशिक व मालेगाव महापालिकेच्या समन्वयाने विविध विभागांच्या माध्यमातून 40 स्टाॅल उभारण्यात आले हाेते. जिल्हा काैशल्य विकास कार्यालयाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय राेजगार मेळावाही आयाेजिण्यात आला हाेता. या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध याेजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले.