तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सध्या चर्चा आहे ती कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय).‘जेनरेटिव्ह आर्टिफिशल इंटेलिजन्स’ असाही तिचा उल्लेख करतात आणि या तंत्रज्ञानाचा वापर वाढताे आहे. आपण यापूर्वी अनेक औद्याेगिक बदल पाहिले असले, तरी एआयबराेबर त्यांची तुलना हाेऊ शकणार नाही. ‘लाेकतांत्रिकरणाचा आजवरचा सर्वांत माेठा स्राेत,’ अशा शब्दांत ‘एन्व्हिडिया’चे प्रमुख जेन्सन हुआंग यांनी तिचे वर्णन केले आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या टूलचा वापर करण्यासाठी तुम्हाला काेणतीही प्राेग्रामिंग भाषा येण्याची गरज नाही. इंग्लिश भाषेचे थाेडे ज्ञान असणेही त्यासाठी पुरेसे आहे. जेनरेटिव्ह एआयच्या याेग्य वापरामुळे पुढील दशकात जागतिक सकल घरगुती उत्पादनात सुमारे सात ट्रिलियन डाॅलरची वाढ हाेण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्या मंदावलेला औद्याेगिक उत्पादनाचा वेग पाहता, विकास आणि उत्पादनात वाढ करू शकणाऱ्या उद्याेगात गुंतवणुकीची गरज आहे.
त्याचबराेबर पर्यावरणातील बदलांच्या संकटाबराेबर सामना करण्यासाठीसुद्धा उपयुक्त तंत्रज्ञान हवे. मात्र, हे करताना आपल्याला मर्यादा सांभाळण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करतात. या स्थितीत जेनरेटिव्ह एआयच्या क्षेत्रात विचारशील नेतृत्व देण्याची भारताला संधी आहे. आर्थिक व्यवहारांसाठी यूपीआय पेमेंट व्यवस्था असाे किंवा शिक्षणाचा प्रसार, आपल्याला त्याचा अनुभव आहे. त्यासाठी सेवा आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी प्लॅटफाॅर्म तयार करावे लागतील. ते किफायती आणि वेगाने वाढणारे असावे लागतील. भारतात याचा विचार 2019मध्येच झाला. सर्वांना एआय सक्षम करण्यासाठी त्या वर्षी रणनीती तयार करण्यात आली आणि तेव्हापासून सरकार, उद्याेग जगत आणि स्टार्टअप्स यांनी एआयचा समावेश असलेले उपाय आखण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे.
जीवन, व्यवसाय आणि समाजाच्या सर्व पैलूंमध्ये महत्त्वपूर्ण उत्पादकता मिळविण्यासाठी आपल्याला आता एका व्यापक जेनरेटिव्ह एआय रणनीतीची गरज आहे. त्याचा याेग्य पद्धतीने लाभ घेतला, तर आपण प्रत्येक उत्पादन, सेवा आणि प्रक्रियांमध्ये संवर्धित बुद्धिमत्ता वापरून पायाभूत मजबुती मिळवू शकताे. त्यातून समग्र उत्पादकतेतसुद्धा उल्लेखनीय वाढ हाेईल. त्यासाठी नवा दृष्टिकाेन स्वीकारावा लागेल. त्यासाठी काैशल्य ही पहिली पायरी आहे.‘ओईसीडी’ या संस्थेच्या म्हणण्यानुसार, एआय काैशल्य मिळविण्यात भारत अव्वल असून, ते काैशल्य नव्या पिढीपर्यंत पाेहाेचविण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानाचा विचारपूर्वक वापर करणारी पिढी आपल्याला तयार करावी लागेल.ही पिढी त्यात तयार झाल्यावर आपल्याला या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करता येणे श्नय आहे.
जागतिक दर्जाचे काैशल्य असलेले दहा लाख एआय प्रशिक्षित लाेक तयार करून आपल्याला त्याचा लाभ मिळविता येईल. त्याशिवाय 1.80 काेटी ते 2 काेटी लाेकांचे एक सशक्त कार्यबल तयार करावे लागेल आणि त्यामुळे सर्वांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान देऊन त्याचा वापर करणारी नवीन पिढी तयार हाेईल. यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे ही दुसरी पायरी. माेठ्या संख्येने डेटा, ताे कार्यान्वित करण्यासाठी मेगा काॅम्प्युटिंग पाॅवर आणि हे अमलात आणण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद या तीन मुद्द्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ठरताे. त्यामुळे भारताला आपल्या क्षमतांच्या विकासासाठी पुरेशी गुंतवणूक करायला हवी आणि जास्त गुंतवणुकीची गरज काेठे आहे, हेसुद्धा पाहावे लागेल.
पायाभूत माॅडेल : आपल्याला माेठ्या प्रमाणात आणि खात्रीशीर एआय माॅडेल विकसित करून त्याचा वापर करावयाचा असेल, तर देशातील भाषिक विविधता आणि आपल्या सांस्कृतिक संदर्भांचा विचार करावा लागेल.
काॅम्प्युटिंग पाेहाेच : त्यासाठी एक राष्ट्रीय जीपीयू ्नलाउड स्थापावा लागेल. अन्य कंपन्यांच्या मदतीने सरकारला हे काम करता येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विज्ञानाचा प्रसार वाढविण्यासाठी कंपन्यांना प्राेत्साहन द्यावे लागेल. खासगी क्षेत्राच्या मदतीने पायाभूत सुविधा तयार करून शिक्षणतज्ज्ञ तसेच स्टार्टअप त्याला जाेडले पाहिजेत. यासाठीचे सेवाशुल्क असे असावे, की दहा वर्षांत त्याची वसुली हाेऊ शकेल.
विशेष आर्थिक एआय ्नलस्टर : नवाचार आणि उत्पादनांच्या विकासात वाढ हाेण्यासाठी आराेग्य सेवा, कृषी, ऊर्जा, प्राॅड्नशन, संरक्षण आदी मुख्य क्षेत्रांसाठी व्हर्च्युअल एआय ्नलस्टर तयार करावे लागेल. हे प्रत्येक ्नलस्टर गुंतवणूक, पेटंटला जलद परवानगी देणे, मेंटरशिप आणि उद्याेग लिंक देईल. एआय तंत्रज्ञानाचा वापर विचारपूर्वक करण्यासही प्राेत्साहन द्यावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यात काेणते रूप दाखवेल याची काळजी आता निर्माण झाली आहे. मात्र, त्याचा जबाबदारीने वापर करण्याचे आव्हान भारत पेलू शकेल. मानवकेंद्रित विकासासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणे श्नय आहे.त्यामुळे भारताला या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते.