शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करणार : मुख्यमंत्री

    07-Sep-2023
Total Views |

 


teachers
 
 
विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे, तरुण पिढी आणि देश घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यांच्या अडचणीसाेडवण्याचे शासनाचे धाेरण असून, शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.सन 2022-23 च्या क्रांतिज्याेती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगाैरव पुरस्कारांसाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय 108 शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना शिक्षकदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहकुटुंब गाैरवण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री कपिल पाटील, विक्रम काळे, किरण सरनाईक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयु्नत सूरज मांढरे यांच्यासह पुरस्कार विजेते शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित हाेते. एक लाख दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे काम बलशाली देश घडवण्यात साह्यभूत ठरले पाहिजे; तसेच इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरले पाहिजे. हे शिक्षक राज्य शासनाचे ब्रँड अँबेसेडर ठरले पाहिजेत, अशी अपेक्षा पवार यांनी व्य्नत केली. ‘प्रगतिशील भारत घडवण्यात शिक्षकांचा माेलाचावाटा आहे. वाचायला शिकवणारा शिक्षक समाजाला घडवताे आणि वाचवताे,’ असे अ‍ॅड. नार्वेकर यांनी सांगितले.शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर साेडवण्याचे शासनाचे धाेरण असल्याचे केसरकर यांनी सांगितले.जनगणना आणि निवडणुकीच्या कामांव्यतिर्नित अन्य अशैक्षणिक कामे विभागाच्या परवानगीशिवाय लादली जाऊ नयेत, यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासन याबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिक्षकांचे मुख्यालय किती अंतरापर्यंत असावे, हेही लवकरच निश्चित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षण आयु्नत मांढरे यांनी प्रास्ताविकातून शिक्षक पुरस्कारांसाठीच्या निवडप्रक्रियेची माहिती दिली.