स्वाईन फ्लूपासून बचावासाठी पुढील उपाय करता येतील.दरराेज सकाळी उठून 5 तुळशीची पाने धुवून खावीत. गुळवेलच्या एक फुट लांबीच्या फांदीचा भाग, तुळशीच्या पाच-सहा पानांबराेबर 15 मिनिटांपर्यंत उकळावे. स्वादाच्या अनुसार सैंधव मीठ अथवा खडीसाखर मिसळावी.काेमट झाल्यानंतर हा काढा प्यावा. याने आपली राेगप्रतिराेधक शक्ती वाढते.हमदर्द बैद्यनाथ अथवा एखाद्या चांगल्या आयुर्वेदिक औषध कंपनीचे गूळवेल ही घेतले जाऊ शकते.लसणाच्या दाेन पाकळ्या दरराेज सकाळी रिकाम्या पाेटी काेमट पाण्याबराेबर अवश्य घ्याव्यात. याने राेग प्रतिराेधक शक्तीमध्ये वाढ हाेते. रात्री झाेपताना हळदीचे दूध अवश्य प्यावे.
100 मिली पाण्यामध्ये तीन ग्रॅम कडुलिंब, गुळवेल, चिराइना यांजबराेबर अर्धा ग्रॅम काळे मिरी आणि एक ग्रॅम सुंठ यांचा काढा बनवून पिणेही फार लाभदायक आहे हे पदार्थ पाण्याबराेबर ताेपर्यंत उकळावेत जाेपर्यंत पाणी 60 मि.ग्रॅ.उर्वरित राहिल. एक आठवड्यापर्यंत दरराेज रिकाम्यापाेटी हे पिण्याने स्वाईन फ्लूशी लढण्यासाठी शरीरामध्ये आवश्यक इम्यूनिटी उत्पन्न हाेईल.त्रिफळा, त्रिकटू, मधुयास्ती आणि गुळवेल सममात्रेत घेऊन हे एक चमचा घ्यावे. याने प्रतिराेधक क्षमता वाढते.हे औषध भाेजनानंतर दाेन वेळा घेण्याने फायदा हाेईल.