दिव्यांगांचे प्रश्न अधिक गतीने साेडवण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग धाेरण तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चू कडू यांनी केले.दिव्यांगांच्या अडचणी साेडवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत महासैनिक दरबार सभागृहात एकदिवसीय शिबिर घेण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयु्नत के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संताेष पाटील, इचलकरंजी महापालिकेचे आयु्नत ओमप्रकाश दिवटे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिक सुषमा देसाई, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुप्रिया देशमुख; तसेच विविध विभागांचे अधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित हाेते.
यावेळी विशेष प्रावीण्यप्राप्त व्य्नतींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिव्यांगांसाठी कार्य करणारे राष्ट्रीय पारिताेषिक प्राप्त देवदत्त माने, केंद्रीय जीएसटी विभागाच्या सहायक आयु्नत पूजा कदम, लेखिकाअनुवादक साेनाली नवांगुळ, चित्रकार विजय टीपुगडे, भारतश्री किरण बावडेकर, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती दीक्षा शिरगावकर, सांस्कृतिक मंत्रालयाकडून यंग आर्टिस्ट स्काॅलरशिप प्राप्त प्रणय बेलेकर, वरिष्ठ राष्ट्रीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेतील राैप्यपदक विजेता उत्कर्ष चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला; तसेच विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला.
दिव्यांगांसाठी यूडीआयडी ओळखपत्र, रेशनकार्ड, घरकुल मिळवून देण्यात येत आहेत. दिव्यांगांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक याेजनेतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. दिव्यांगांच्या बचतगटांना उद्याेग, शाळा, सहकारी संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगांचा विकास साधत हा विभाग अधिक गतिशील करण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन कडू यांनी केले. कार्यक्रमानंतर कडू यांनी दिव्यांगांसाठी लावण्यात आलेल्या सर्व स्टाॅल्सला भेट दिली. तसेच त्यांना येणाऱ्या अडीअडचणींबाबतची पत्रे स्वीकारून याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.