स्पर्म व्हेल मासा जलचरांमध्ये सर्वांत अद्वितीय आहे. ही मादा स्पर्म व्हेल आपल्या पिल्लांशी आयुष्यभर समर्पित राहते, तर नर स्पर्म व्हेल मासे इतरत्र भटकतात. या मादा स्पर्म व्हेलचे मातृत्व वाखाणण्याजाेगे आहे. या मादा स्वत:च्याच नव्हे, तर इतर स्पर्म व्हेल माशांच्या पिल्लांचीही काळजी घेतात. स्पर्म व्हेल माशांचा मेंदू इतर जलचर प्राण्यांच्या तुलनेत माेठा व जड असताे. एका प्राैढ स्पर्म व्हेलचा मेंदू 7-8 किलाे वजनाचासुद्धा असू शकताे.मादा स्पर्म व्हेल त्यांच्या मेंदूच्या भावनांचे आदान -प्रदान, सामाजिकरण आणि भाषेसाठी वापर करतात. मेंदू ही त्यांची भाषाच असते व बऱ्याच वेळा भाैगाेलिक जागेच्या आधारावर त्याची भाषाशैलीसुद्धा बदलते.