दागिन्यांमध्ये केलेली गुंतवणूकही फायद्याची ठरते

    29-Sep-2023
Total Views |
 
 
 


ornaments
 
 
 
साेने-चांदीसारखे धातू आणि हिऱ्यांसारख्या रत्नांचे आकर्षण प्राचीन काळापासून आहे. साैंदर्याबराेबरच गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून साेन्याला आजही पसंती दिली जाते. सध्याच्या अस्थिर काळात दागिन्यांमधील गुंतवणुकीचा पर्याय असून, अनेकांनी ताे स्वीकारला आहे. साेन्या-चांदीची नाणी अथवा त्यांचे बार ही गुंतवणुकीची पद्धत असली, तरी ते बहुतेकदा तिजाेरीतच राहत असल्याने त्यांचा फार उपयाेग हाेत नाही.दागिने म्हणजे चालतीफिरती गुंतवणूक असून, ती तुमच्या पुढील पिढ्यांनासुद्धा उपयुक्त ठरते. तरलता हा काेणत्याही गुंतवणुकीतील मुख्य निकष असल्याने त्यावर साेने अव्वल ठरते. ते कधीही आणि काेठेही विकून राेख रक्कम मिळविता येते. राेखे बाजारातील अनिश्चिततेच्या काळात अनेकांना साेने हाच पर्याय याेग्य वाटताे. दागिने आणि साेन्या-चांदीतील गुंतवणुकीबाबत आणि ती करताना काय काळजी घ्यावी याबाबत आरेन ज्वेलर्सच्या संस्थापिका शिखा अग्रवाल यांनी माहिती दिली आहे.
 
खास दुकानांतूनच खरेदी करा : दागिन्यांची खरेदी नेहमी नामवंत ज्वेलर्स, खास दुकाने अथवा सराफी व्यावसायिकांकडून करावी. या लाेकांना त्यांच्या क्षेत्राचा दीर्घ अनुभव असल्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचा पाया भक्कम राहताे. दागिने खरेदी करण्यापूर्वी चाैकशी करा आणि दागिन्यांचे मूल्यांकन कसे केले जाते हे पाहा. सराफी व्यावसायिकांबराेबर बाेलल्यामुळे तुम्हाला खूप माहिती मिळते आणि परस्पर विश्वासाचे नातेही तयार हाेते.
 
भावनांवर नियंत्रण ठेवा : तुम्ही दागिने खरेदी करता तेव्हा केवळ सुरक्षित गुंतवणूक करत नसता, तर दागिन्यांच्या रूपात तुमच्या भावनाही त्यात गुंतलेल्या असतात. तुम्हाला खराेखर आवडलेल्या आणि तुम्ही वापरणार अथवा भेट देणार असलेल्या दागिन्यातच गुंतवणूक करा. दागिन्यांच्या साैंदर्याबराेबरच त्याचे मूल्यसुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.
 
उच्च दर्जाला प्राधान्य : शुद्ध आणि खऱ्या धातू अथवा रत्नांपासून तयार केलेल्या दागिन्यांची खरेदी करणे चांगले. उदा. साेने आणि प्लॅटिनम.हे दाेन्ही धातू अत्यंत मूल्यवान असून, आर्थिक घडामाेडींतील बदलांना सामाेरे जाण्याची क्षमता त्यांच्यात असते. महाग दराच्या ्नलासिक रिंग्ज, एलेगंट इअरिंग्ज अथवा नेकलेस यांचे मूल्य कधी कमी हाेत नाही. ते स्थिरच राहत असल्यामुळे दागिने खरेदी करताना उच्च दर्जाला प्राधान्य दिले पाहिजे.
 
माैल्यवान धातू आणि रत्ने : साेने आणि प्लॅटिनमसारख्या माैल्यवान धातूंमुळे दागिन्यांचे मूल्य वाढते. आर्थिक अस्थिरतेच्या काळातसुद्धा या धातूंचे मूल्य कायम राहते. या धातूंसाेबत हिरे किंवा अन्य रत्ने जडवलेले दागिने घेणे फायद्याचे असते. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्यसुद्धा वाढत जाते. रत्नांची खरेदी करताना त्यांची गुणवत्ता आणि दर्जाकडेही लक्ष दिले पाहिजे. विशेषत: पादपरदेशा, नीलम आणि नैसर्गिक हिरे यांची खरेदी करताना हे लक्षात ठेवावे. ही रत्ने दुर्मीळ असल्याने महागही असतात. रत्नांची खरेदी करताना त्यांची पारदर्शकता (्नलॅरिटी), रंग (कलर) आणि पैलू (कट) हे तीन ‘सी’ आवर्जून लक्षात ठेवा.
 
ब्रँड, कस्टम की अँटिक? : तुम्ही दागिने घेता तेव्हा ती केवळ गुंतवणूक नसते, तर व्यक्तिगत समाधानाचा एक पैलूसुद्धा त्यामागे असताे.हे दागिने वापरताना मिळणारा आनंद शब्दांत सांगता येत नाही. दागिने खरेदी करताना ब्रँडचे, ऑर्डर देऊन बनवून घेतेलेले (कस्टम) की पुरातन (अँटिक) घ्यावेत याचा निर्णय तुमचा असताे.
 
डिझायनर गाेल्ड ज्वेलरी : गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. या दागिन्यांमध्ये वापरलेले धातू आणि डिझायनरने केलेल्या त्यांच्या निर्मितीवरून त्यांचे मूल्य ठरते. ्नलासिक अथवा माॅडर्न अशा दाेन्ही प्रकारांत ही गुंतवणूक याेग्य ठरते. साेन्याच्या दागिन्यांना मूल्य चांगले असते, त्यांना वारसा असताे आणि त्यांचे साैंदर्य प्रदीर्घ काळ टिकणारे असते. चलनवाढ आणि आर्थिक अस्थैर्याच्या काळात ही गुंतवणूक चांगली ठरते. 24 किंवा 18 कॅरेटच्या साेन्यासह तयार केलेले दागिने त्याचे मूल्य वाढवितात.