भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी (26 सप्टेंबर) सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरतीदेखील केली. जे. पी. नड्डा यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.