डाेकेदुखीची कारणे आणि काही साेपे उपाय

    29-Sep-2023
Total Views |
 

headache 
 
आजच्या काळात डाेकेदुखी हा सर्वसाधारण आजार मानला जात आहे.डाेकेदुखी काेणालाही, कधीही आणि काेणत्याही कारणामुळे हाेऊ शकते. पूर्वी फक्त काही वेळेला एखाद्या व्यक्तीकडून डाेकेदुखीविषयी ऐकण्यात येत असे, परंतु आता लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत डाेकेदुखीचा आजार वाढत चाललेला आहे.सर्वजण या आजारामध्ये गुरफटले गेले आहेत. त्याची अनेक कारणे आहेत.जर एखादी व्यक्ती खूप विचार करत असेल तर तिला डाेकेदुखीची समस्या हाेऊ शकते.कधी-कधी एखाद्या छाेट्या कारणामुळेही डाेकेदुखी हाेऊ शकते आणि कधी-कधी तर त्याचे कारणही मिळत नाही. जास्त काळजी करणे आणि अपुरी झाेप घेणे यामुळेही डाेकेदुखी हाेते.या सर्वांसाठी डाेके दुखणे ही साधारण गाेष्ट आहे. मात्र जे लाेक मद्यपान करून रात्रभर जागरण करतात, कमी वेळ झाेपतात, त्यांना सतत डाेकेदुखीची समस्या भेडसावते.
 
सध्या युवापिढीतही नशा करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे हे देखील एक डाेकेदुखीचे कारण हाेऊ शकते.फरीदाबादचे डाॅ्नटर आर.पी.सिंह यांचे मत आहे की, डाेकेदुखीची समस्या ही किरकाेळ नसून त्याला गंभीरतेने घेणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की जास्त दिवस चालणाऱ्या डाेकेदुखीचे मायग्रेनमध्येही रूपांतर हाेऊ शकते.डाॅ. सिंह यांचे मत आहे की तीन- दिवसांपेक्षा जास्त दिवस डाेक दुखत असेल तर लगेच डाॅ्नटरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. काही तज्ज्ञांचे मत आहे की जास्त तणाव घेणे टाळावे. एक दिवसात कमीत कमी आठ ते दहा तास झाेप घ्यावी. अमली द्रव्यांपासून दूर राहावे.त्यांनी असेही सांगितले आहे की लहान मुलांनी जास्त वेळ टी.व्ही पाहू नये. तसेच त्यांनी कमी प्रमाणात वाचन करू नये. डाॅ.सिंह म्हणतात, की डाेळे दुखत असल्यास केवळ तज्ज्ञांचाच सल्ला घ्यावा. डाेकेदुखीचं खरं कारण समजल्यावरच त्यावर अचूक उपाय करू शकता