तुमच्या कारचं आयुष्य कसं वाढवाल?

    29-Sep-2023
Total Views |
 
 
 

car 
 
=कार असेल तर ती रनिंग असाे वा नसाे किमान 4000 कि.मी.नंतर सर्व्हिंसिंग करणे जरुरी आहे.
 
=सर्व्हिसिंगमध्ये खालील गाेष्टींची देखभाल करतात. इंजिन ऑईल चेंज करणे, एअर िफल्टर साफ करणे, इंजिन ट्युनिंग, बॅटरी कनेक्शन्स ग्रीसिंग, स्पार्क प्लग साफ करणे, ब्रेक टाईट करणे, टायर इंटर चेंज करणे (20,000किमी नंतर), व्हिल अलायन्मेंट चेक, व्हिल बॅलन्सिंग चेक ही जनरल चेकअप्स आहेत. याखेरीज काही तक्रार असेल तर मेकॅनिकला सांगून करून घेणे.
 
=याखेरीज गाडीमधे नेहमी एक टाॅर्च, जॅक, सुरी, दाेरी असावी.तसेच फ्यूजचा एक सेट असावा. बऱ्याच जणांना टायर पंक्चर झाल्यावर टायर रिप्लेस करता येत नाही. हे गरजेचे आहे.
 
=शिवाय हल्ली टाेल ्री नंबर असतात ते माेबाईलवर सेव्ह करून ठेवावेत. गाडी मेंटेनन्सचे शेड्यूल माेबाईलवर सेव्ह करावे. वार्षिक अंदाजे रु. 10,000 मेंटेनन्ससाठी बाजूला ठेवणे चांगले.
 
=गाडी काढताना ब्रेक, आरसे, लाॅक, चाकांतील हवा या गाेष्टी व्यवस्थित आहेत की नाही ते तपासा. राेजच्या राेज हे तपासणं कंटाळवाणं वाटत असलं, तरी एक दिवसाआड का हाेईना तपासा.म्हणजे ऐन गडबडीच्या वेळेस हाेणारा खाेळंबा टाळता येईल.
 
=हेड तसंच टेल लाइट, हाॅर्न, स्टार्टर, मेन किंवा साइड स्टँड, टाकीचं झाकण अशा लहान; पण महत्त्वाच्या अ‍ॅक्सेसरीज आहेत.गाडी जुनी हाेऊ लागते तशा बिघडू लागतात. कित्येकदा वेळ नसल्यामुळे त्या दुरुस्त करून घेतल्या जात नाहीत. पण याकडे दुर्लक्ष करू नका.
 
=चारचाकी चालवत असाल, तर दरराेज सीटची अ‍ॅडजेस्टमेंट, आरशाचं िफटिंग, सर्व चाकांमधली हवा, ब्रेक, अ‍ॅक्सिलरेटर, वायपर या गाेष्टी प्रत्येक वेळेस चेक करा.