
व्हीआयपी, सेलिब्रिटजचे छंद, तसेच ते वापरत असलेल्या वस्तू या बाबतच्या बातम्या छापून येतात. कारण प्रत्येकाच्या मनातउत्सुकता असते. अशीच उत्सुकता पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबाबत आहे.पंतप्रधान माेदी माेबाइल वापरतात का? आणि वापरत असतील तर ताे काेणता? असे प्रश्न लाेकांना पडतात.त्याचे उत्तर असे, की पंतप्रधान माेदी रुद्रा फाेन वापरतात. हे वाचून अनेकांनी गुगलवर रुद्रा कंपनीचा माेबाइल सर्च केला. कारण रुद्रा फाेन बाजारात दिसत नाही. खास पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यासाठीच रुद्रा फाेन इले्नट्राॅन्निस अँड इन्फाॅर्मेशन टे्ननाॅलाॅजी विभागाने तयार केला आहे. सॅटेलाईट फाेन टे्ननाॅलाॅजीवर आधारित या रुद्रा फाेनला रिस्ट्र्निटेड एरिया ए्नस्चेंज फाेन म्हणतात. हा फाेन अँक्रिप्टेड आहे. हा फाेन हॅक करता येत नाही किंवा ट्रेससुद्धा करता येत नाही. हा फाेन आर्मीच्या फ्रिक्वेन्सी ब्रँडवर काम करताे. या अँड्राईड फाेनमध्ये स्पेशल ऑपरेशन सिस्टीम बसवलेली आहे. या फाेनमध्ये सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी इनबिल्ट स्नियुरिटी चिप बसविण्यात आली आहे. या फाेनची किंमत किती आहे किंवा हा खास फाेन तयार करण्यासाठी किती खर्च आला, हे जाहीर करण्यात आलेले नाही.