राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणात उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नाेंदणी 2035 पर्यंत 50 ट्नकेइतकी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज राज्यातील उच्च शिक्षणातील सकल नाेंदणी 32 इतकी आहे. गडचिराेलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात हे प्रमाण 14 ट्नकेआहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील ड्राॅप आऊट दर जास्त आहे.हे चित्र बदलून आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील ट्नका वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करावीत; तसेच त्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना राज्यपालांनी राज्यातील कुलगुरूंना केली.‘आदिवासी विकास व संशाेधन’ या विषयावर राजभवनात राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या दुसऱ्या परिषदेचे उद्घाटन करताना राज्यपाल बाेलत हाेते.
परिषदेचे आयाेजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पुढाकाराने करण्यात आले हाेते. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयाेगाचे माजी अध्यक्ष हर्ष चाैहान, बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठ (राजपिपला), गुजरात येथील कुलगुरू मधुकरराव पाडवी, स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. उद्धव भाेसले, डाॅ. उपेंद्र कुलकर्णी तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू यावेळी उपस्थित हाेते. आदिवासी समाजाचे अध्ययन व संशाेधन कार्यालयात बसून हाेणार नाही. त्यामुळे कुलगुरूंनी आदिवासी गावांत समक्ष जाऊन तेथील समस्या समजून घ्याव्यात, अशी सूचना राज्यपालांनी केली. विद्यापीठांनी आदिवासीबहुल गावांशी संपर्क वाढवावा.
काही गावे दत्तक घ्यावीत व आदिवासींचा जीवनस्तर वाढेल अशा याेजनांत गुंतवणूक करावी, असे राज्यपालांनी सांगितले. भारतीय इतिहासात आदिवासी हा शब्दच मुळी नव्हता; तर नगरवासी, ग्रामवासी व वनवासी असे भाैगाेलिक स्थितीवर आधारित शब्द हाेते. इंग्रजांनी आदिवासी शब्दाची परिभाषा केली आणि स्वातंत्र्यानंतर तीच परिभाषा आपण स्वीकारली. आदिवासी समाज कमी बाेलणारा आहे. त्यामुळे उद्याेजक-धाेरण निर्मात्यांना आदिवासी समाजाची पुरेशी माहिती नाही. या दृष्टीने आदिवासी समाजावर व्यापक संशाेधन व डाॅक्युमेंटेशनची गरज आहे, असे प्रतिपादन हर्ष चाैहान यांनी केले.भारतीय संस्कृती व अध्यात्माचा आदिवासी संस्कृतीशी प्राचीन संबंध आहे. आदिवासी परंपरा अद्भुत असून, आदिवासींच्या सणांत वैज्ञानिक दृष्टिकाेन आहे. जल, जमीन, जंगलासाेबतचे त्यांचे नाते पर्यावरणपूरक असे आहे. त्यामुळे सर्व समाजांनी आदिवासींची जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन डाॅ. पाडवी यांनी केले.