गॅझेटशी मुलांची वाढती जवळीक ही पालकांसाठी डाेकेदुखी

    29-Sep-2023
Total Views |
 
 


Gazette
 
 
 
सध्या लहान मुले विशेषतः शाळेत शिकणारी मुले माेबाइल, लॅपटाॅप यासह इतर गॅझेट्स माेठ्या प्रमाणावर वापरू लागले आहेत. मुलांची गॅझेटशी जवळीक आता पालकांची डाेकेदुखी बनली आहे.मिशिगन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. मुलांचा स्क्रिन टाइम वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या व कुटुंबात दुरावा निर्माण हाेऊ लागला आहे. साेशल मीडिया आणि व्हिडिओचे व्यसन मुलांची वागणूक बिघडवत आहे. मुलांच्या आराेग्याविषयी सी. एस. माॅट चिल्ड्रन्स हाॅस्पिटलच्या राष्ट्रीय सर्व्हेत आढळून आले आहे, की किशाेरवयीन मुले मानसिक रुग्ण हाेत असल्याबद्दल निम्म्यापेक्षा जास्त पालक चिंताग्रस्त झाले आहेत. अमेरिकेत मुले तंत्रज्ञानाचा अतिवापर करीत असल्यामुळे मुले लठ्ठ हाेत आहेत. बालराेग तज्ज्ञ आणि एमपीएच सुसेन कुडफाेर्ड म्हणाले की, जंकफूड खाण्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे पाहून पालक हैराण झाले आहेत. मात्र मानसिक आराेग्य, साेशल मीडिया आणि स्क्रिन टाइममुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत.
 
या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार 2 हजार 99 पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या व मुलांच्या मानसिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली.वूडफाेर्ड म्हणाले, की मुलांना गॅझेट्सपासून दूर कसे ठेवावे, ही पालकांसाठी माेठी समस्या आहे. यावर उपाय असा आहे, की मुलांचे मूल्यांकनकरणे आवश्यक आहे. काेराेना महामारीच्या काळात मुलांचा स्क्रिन टाइम माेठ्या प्रमाणावर वाढला आहे.यासाठी पालकांनी मुलांची वागणूक किंवा आराेग्यावर नकारात्मक प्रभाव दिसत असेल तर लगेच उपचार करावा.साेशल मीडिया आणि इंटरनेटवर वेळ घालविण्यात भारतीय मुलेही मागे नाहीत. सन 2022च्या सर्व्हेनुसार भारतात 9 ते 13 वर्षांची मुले दरराेज 3 तासांपेक्षा जास्त वेळ गॅझेट्सवर घालवतात. त्यात साेशल मीडिया, व्हिडिओ आणि गेम्सचा समावेश आहे.यामुळे मुलांमध्ये हिंसात्मक प्रवृत्ती वाढत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.भारतात 46.1 काेटी साेशल मीडिया युजर्स आहेत.