जगात प्रथमच अत्याधुनिक ए. आय. टे्ननाॅलाॅजीचा वापर करून स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झालेले जयेश सचदेवा यांनी गणेशमूर्तीची विधिपूर्वक स्थापना केली असून, देशाेदेशींच्या 1 लाख 45 हजार लाेकांनी या गणेशमूर्तीचे दर्शन घेतले. त्यात भारतीय चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांचाही समावेश आहे.स्वित्झर्लंडमध्ये दरवर्षी आयाेजित हाेणाऱ्या आर्टबेसलमध्ये (इंटरनॅशनल आर्ट फेअर) ही गणेशमूर्ती ठेवण्यात आली आहे. ही मूर्ती आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातील आकर्षण ठरली आहे. रितेश देशमुख यांनी ग्रीन हार्ट इमेजिससाेबत ‘असाधारण’ अशा शब्दांत प्र्रतिक्रिया व्य्नत करून श्रीगणेशाला वंदन केले, तर शेकडाे लाेकांनी ‘जिवंत श्रीगणेशाचे अद्भुत दर्शन’ असे मत व्य्नत केले. सध्या भारतात माेठ्या उत्साहाने गणेशाेत्सव साजरा हाेत आहे.सार्वजनिक गणेशाेत्सवाच्या इतिहासात स्वित्झर्लंडमध्ये गणेशमूर्ती स्थापन करण्यासाठी प्रथमच ए.आय. चा वापर करण्यात आला आहे. यामुळे देशाेदेशीच्या गणेशभ्नतांना त्याबाबत उत्सुकता वाटत आहे.