मेरी माटी मेरा देश उपक्रमातंर्गत सध्या अमृतकलश अभियान सुरू आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अमृत कलशाला येथे माती आणि तांदूळ समर्पित केले. हे अभियान संपूर्ण नागपूर शहरात सक्रियतेने राबवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.देशातील शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी, मातृभूमीचे वंदन करण्यासाठी हे अभियान देशभर राबवण्यात येत आहे.यात लाेकप्रतिनिधींना सहभागी करणे हाही गणेशाेत्सवातील एक उपक्रम असून, नागपूर शहरातील लाेकप्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्रीफडणवीस यात सहभागी झाले. स्थानिक स्तरांवर विविध नगरांतून निघालेल्या कलशयात्रेचे त्यांनी स्वागत केले. फडणवीस यांनी शहरातील विविध मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी व राज्यावरील विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली. या प्रसंगी मंडळांकडून उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत अमृत कलशाने करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांनीही या अमृत कलशात माती व तांदूळ समर्पित करत मंडळांचा उत्साह वाढवला. या उपक्रमात नागपूरच्या मंडळांनी नाेंदवलेल्या सहभागाबद्दल फडणवीस यांनी सर्व मंडळांचे अभिनंदन केले.