कुठलेही टाॅनिक, जीवनसत्त्वाच्या गाेळ्या किंवा वजन वाढवणाऱ्या, कमी करणाऱ्या गाेळ्या कधीही स्वतः च्या मनाने किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून घेऊ नये.त्याचे प्रतिकूल परिणाम हाेण्याची शक्यता असते. शरीरात अन्नपदार्थाखेरीज कुठलेही वेगळे घटक घ्यायचे असतील तर त्यासाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. डाॅक्टरांनी सांगितल्याखेरीज, कुठलेही टाॅनिक किंवा श्नितवर्धक गाेळ्या घेऊ नयेत. औषधे घेण्यासंदर्भातील काही उपयुक्त माहिती.
1. गाेळ्या शक्यताे नाश्ता किंवा जेवणानंतर घ्याव्यात.रिकाम्यापाेटी घेऊ नयेत.
2. लाेहयुक्त टाॅनिक द्रव स्वरूपात घेत असल्यास, औषध घेतल्यावर भरपूर पाणी प्यावे. अन्यथा काही दिवसांनी दातांवर काळी छटा येते.
3. लाेहयुक्त टाॅनिक रिकाम्यापाेटी न घेता शक्यताे रात्री झाेपण्यापूर्वी घ्यावे.
4. लाेहाच्या गाेळ्या किंवा औषधे घेऊ लागल्यावर शाैचाचा रंग काळपट हाेताे, हे अपेक्षितच आहे.
5. कॅल्शिअमच्या गाेळ्या किंवा औषध सकाळी उठल्यावर रिकाम्या पाेटी घ्यावे.
6. कॅल्शिअम किंवा आयर्न ही दाेन्ही औषधे एकत्र घेऊ नका.
7. काेणतेही टाॅनिक, आयर्न, कॅल्शिअम किंवा जीवनसत्त्वाच्या गाेळ्या चहा, काॅफीबराेबर घेऊ नका.