राजस्थानमधील महिलेने एकाच वेळी दिला चार मुलांना जन्म

    28-Sep-2023
Total Views |
 
 
 

birth
 
 
 
 
 
राजस्थानच्या टाेंकमध्ये एका 28 वर्षीय महिलेने दाेन मुली आणि दाेन मुले अशा चार मुलांना जन्म दिला. किरण कंवर असे या महिलेचे नाव असून, ती वजीरपुरा येथील रहिवासी आहे. आयुष्मान रुग्णालयाच्या डाॅक्टर शालिनी अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास तिला प्रसूतीवेदना हाेऊ लागल्याने कुटुंबीय तिला घेऊन रुग्णालयात दाखल झाले.सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास या महिलेने चार मुलांना जन्म दिला.डाॅ. अग्रवाल यांनी सांगितले, की तीन नवजात बालकांचे वजन 1 किलाे आणि 350 ग्रॅम आहे, तर चाैथ्या बाळाचे वजन 1 किलाे आणि 650 ग्रॅम आहे.
 
या मुलांवर विशेष देखरेखीची गरज आहे. 1 किलाे 350 ग्रॅम वजनाच्या तीन मुलांना सुरक्षिततेसाठी झनाना हाॅस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. चाैथ्या मुलाला आईकडे ठेवण्यात आले आहे.वैद्यकीय शास्त्रामध्ये जुळी किंवा तिळी मुले एकत्र जन्माला आल्याची प्रकरणं अनेकदा पाहायला मिळतात. पण, चार मुले एकत्र जन्माला आल्याची प्रकरणं क्वचितच ऐकायला आणि बघायला मिळतात. डाॅक्टर सांगतात, की 10 लाख प्रसूतींपैकी फक्त एकाच प्रकरणात चार बाळे एकत्र जन्माला येतात. अनेक प्रकरणांमध्ये चारपैकी एक किंवा दाेन बाळांचे मृत्यूदेखील हाेतात. मात्र, या प्रकरणात चारही बाळे निराेगी आहेत.