पक्ष्यांची चिवचिवाट ऐकूनही आपले मानसिक आराेग्य उत्तम राहू शकते. त्यामुळे मानसिक शांती हवी असेल, तर पक्ष्यांचे सान्निध्य हवेच, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ज्या भागात पक्षी कमी असतात, त्या भागात मानसिक समस्या जास्त प्रमाणात आढळून आल्या. अमेरिकेतील मिशिगन राज्यात केलेल्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे.जर आपल्या आसपासच्या वातावरणात पक्षी व इतर जीवजंतू कमी असतील, तर चिंता आणि मानसिक विकार वाढतात असेही आढळून आले आहे. जिओग्राफी अँड एन्व्हायर्नमेंट जर्नलमध्ये हा निष्कर्ष प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे, की पक्ष्यांची कमी संख्या मानसिक विकाराचे माेठे कारण आहे. त्यामुळे मानसिक रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात आढळून येतआहे. अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले, की ज्या ठिकाणी हिरवळ नसते अशा ठिकाणी चिंता जास्त असते.
यावरून स्पष्ट हाेते, की मानसिक रुग्ण व पक्ष्यांचा काही तरी संबंध निश्चित आहे, असे मत कॅनडातील कार्लटन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंट अँड इंटरडिसिप्लिनरी सायन्सेसचे सहायक प्राध्यापक डाॅ. रशेल ब्नसटाेन यांनी मांडले.आपल्या घराच्या आसपास हिरवळ असावी, अशी आपण कल्पना करताे. परंतु या साेबतच पक्षी व इतर जीवजंतूंचीही गरज असते.ते माणसाच्या हिताचेच आहे, असे ब्नसटाेन यांनी सांगितले.ते म्हणाले, प्राण्यांच्या जैवविविधतेमुळे मानसिक आराेग्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकताे. हेही श्नय आहे, की पृथ्वीवर कमी हाेत असलेली जैवविविधता चिंता आणि मेंदूविषयक विकार दिवसेंदिवस वाढतच जातील.त्यामुळे घराजवळ झाडे, फुलझाडे लावून पक्षी व जीवजंतू कसे वाढतील याची काळजी घेणे आवश्यक आहे.