आनंद निर्माण करण्यासाठी नेहमी अर्ध्या रिकाम्या ग्लासच्या मानसिकतेऐवजी अर्ध्या भरलेल्या ग्लासाची मानसिकता ठेवा. सध्या आपल्या जीवनात ज्या गाेष्टी वाईट घडत आहेत, त्या माेजण्याऐवजी आपल्यासाठी काेणत्या गाेष्टी काम करीत आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करा.
बहुतेक लाेक आपल्या सर्व मागील चुका, वेदना आणि भीती आपल्यासाेबत ठेवतात. जे झाले ते जाऊ द्यायला शिका.जेणेकरून आपण आपली ऊर्जा सध्या काय चालू आहे, यावर केंद्रित करू शकाल. ‘मी क्षमा करायला तयार आहे’ या साध्या विचारासाेबत आपला दिवस घालवा.
ज्या दिवशी आपण आपल्या सर्व दाेष-उणिवांसाेबत स्वत:वर प्रेम करायला शिकाल, ताे आपल्या जीवनातील सर्वांत आनंदाचा दिवस असेल. स्वत:वर प्रेम करण्याचा सराव करण्याची ही पद्धत आहे की, आपण स्वत:ला याची आठवण देत राहावी की आपण विशेष आहात आणि आपण न्नकीच आपल्या प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. स्वत:ला पसंत कराल, तर आनंद आपाेआप आपल्याकडे येईल