केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानास सपत्निक भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहा यांचे गणेशमूर्ती, शाल, श्रीफळ; तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.मंत्री मंगलप्रभात लाेढा, मंत्री दीपक केसरकर, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, खासदार मनाेज काेटक, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित हाेते. फडणवीस यांनी शहा यांचे श्रीकृष्णमूर्ती, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी फडणवीस यांच्या माताेश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा उपस्थित हाेत्या. अमित शहा यांनी लालबागच्या राजाचेही दर्शन घेतले.