ज्यांना आपले वजन कमी करायचे असेल त्यांनी सायकलिंग करावे किंवा पाेहण्याचा व्यायाम करावा.
=जर बाहेर जाॅगिंगला जायचे असेल तर चांगल्या प्रतीचे धावण्याचे स्पाेर्टस् शूज तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने विकत घ्यावेत.
=काेणताही व्यायाम करण्यापूर्वी शरीराची हलकी हालचाल करून वाॅर्मअ=करावे. हलकी पावले टाकून सुरुवात करावी, त्यामुळे गुडघ्यांच्या स्नायूंची दुखापत टळते.
=चांगले आरामदायक इनसाेल असलेले बूट वापरावेत.तुमच्या पायाचा आकार पसरट असेल तर चवडा दुमडला जाणार नाही, त्याला चांगली कुशन मिळेल असे बूट वापरा.
=35 वर्षांवरील व्यक्तींनी ट्रेड मिल वापरताना काळजी घ्यावी.एकाच गुडघ्यावर संपूर्ण शरीराचा भार देणे टाळावे.