जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये एक विचित्र घटना समाेर आली आहे. येथे कुत्र्यांचे कपडे घातलेले शेकडाे लाेक रेल्वे स्टेशनच्या बाहेर जमले आणि कुत्र्यासारखे भुंकायला लागले. हे लाेक स्वतःला चक्क कुत्रा समजत हाेते. कुत्र्याची ‘वेशभूषा’ केलेले लाेक कुत्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाेकांच्या हक्कासाठी जमले हाेते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. मीडिया रिपाेर्ट्सनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ बर्लिनमधील पाॅट्सडेमर प्लॅट्झ रेल्वे स्टेशनचा आहे. कॅनाइन बीइंग्ज ग्रुपतर्फे येथे एका कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. हा गट स्वत:ला कुत्रा समजणाऱ्या लाेकांच्या हक्कासाठी आवाज उठवताे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लाेक कुत्र्यांसारखे आवाज काढताना आणि भुंकताना ऐकू येत आहेत. लाेकांनी कुत्र्यासारखे दिसण्यासाठी बनावट ताेंड, शेपटी आणि कपडे घातले हाेते. या कार्यक्रमात सुमारे 1000 लाेक सहभागी झाले हाेते. मात्र, एक्स कम्युनिटीवर (पूर्वीचे ट्विटर) या कार्यक्रमाच्या व्हिडिओबाबतचा संदर्भ देण्यासाठी एक टीप जाेडली आहे.