लठ्ठपणा कमी करण्यासाठी : शरीरातील काॅलेस्टेराॅल नियंत्रित ठेऊन लठ्ठपणा कमी करण्यासाठी बागकाम ायदेशीर ठरते. दरराेज बागेत 45 ते 35 मिनिटे काम केले असता हा ायदा मिळताे. इथे जी शारीरिक हालचाल हाेते त्यात कॅलरीज बर्न हाेतात. जमीन खाेदणे, नवीन राेपे लावणे, त्यांना पाणी घालणे, खत घालणे, अनावश्यक वाढलेले तण जामिनीतून उपटून काढणे असे अनेक कामे असतात ज्यामुळे चांगला व्यायाम हाेताे.
ील गुड : आपण ुलवलेल्या फळ ुल झाडातून चालणे यासारखा दुसरा आनंद नाही. यामुळे मन प्रसन्न हाेते.आजच्या या धकाधकीच्या आणि अनिवार्य अशा स्पर्धेच्या जगात बाग एक अशी जागा तयार हाेते जिथे तुम्हाला काेणालाही काहीही सिद्ध करून दाखवायचे नाही. एक अत्यंत माेकळं, स्वतंत्र असं हे तुमचं विश्व तयार हाेतं जे तुम्हाला कायम ‘ील गुड’ असा अनुभव देत राहतं.
आहारात सुधारणा : आपण लावलेली फळे खाणे, भाज्या खाणे यामुळे आपसूकच आपण आणि घरातले देखील नैसर्गिक खाण्याला, शाकाहाराला महत्त्व देऊ लागतात. बाजारू आणि जंक ूडचे महत्त्व आपाेआप कमी हाेऊन सेंद्रीय खत घालून ुलवलेल्या भाज्या खाव्यात याबद्दलचा एक अवेअरनेस घरातल्या प्रत्येकात येताे.अनिद्रेची समस्या कमी हाेते : बागकामामुळे तुमचे शरीर आणि मन थकते.व्यायाम तर हाेताेच आणि विशेष म्हणजे बागेतील सगळी कामे लक्ष देऊन करावी लागतात. पानाला कुठे कीड लागलेली नाही ना, पाणी किती प्रमाणात घालायचे आहे हे आणि असे अनेक प्रकार यामुळे मन नीट एका ठिकाणी केंद्रित हाेते. सैरभैर हाेत नाही.
यामुळे रात्री झाेपतांना चांगली झाेप लागते.
निसर्गाशी संवाद : निसर्गाचा सहवास हा उत्तम आराेग्यासाठी अत्यंत आवश्यक असताे. हिरवी पाने डाेळ्यांना तजेला देतात, वरचे निळे आकाश मनाला माेकळेपणा देते, आपण लावलेल्या झाडावर पक्ष्याने जर घरटे बांधले तर त्याचा आनंद काही निराळाच असताे. निसर्गाच्या सहवासात मन शांत आणि स्थिर हाेते. जे आजच्या या तणावाच्या काळात ार महत्त्वाचे आहे.