शरीरातील विषारी द्रव्य पाणी बाहेर काढते

    23-Sep-2023
Total Views |

water
 
जीवनासाठी पाणी अनमाेल आहे. याचे काेणतेही माेल नाही. पर्याप्त पाणी पिणे आराेग्यासाठी खूप गरजेचे आहे. हे फक्त शरीरातील विषारी द्रव्यच बाहेर काढून टाकत नाही तर त्वचा, पाेट आणि किडणी अशा अनेक गंभीर आजारापासून दूर ठेवते.पाण्याचे प्रमाण कमी असल्याने शरीराला अनेक राेग जडतात. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशची समस्या सूरू हाेते.जास्त प्रमाणात पाणी पिल्याने खूप सारे ायद्येही आहेत. वजन कमी करण्याचे सर्वांत साेपे उपाय आहे भरपूर पाणी पिणे.शरीरातील जास्त चरबीला फक्त पाण्याच्या प्रमाणाला वाढवून नष्ट केले जाऊ शकते. पाण्यात चरबी, साखर, कार्बाे हायड्रेट्स नसतात. यामुळे इतर पेय पिण्याची इच्छाही राहात नाही. शरीरात पाण्याचे प्रमाण पर्याप्त असल्यामुळे हृदय झटक्याची शक्यताही कमी असते.
 
पाणी ऊर्जा प्रदान करते.जेव्हा शरीरातील ऊर्जा संपते तेव्हा थकवा येऊ लागताे.तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे घसा काेरडा पडू लागताे.काही लाेकांना चक्करही येताे.थकव्यामुळे लाेकांना मांसपेशीमध्ये अशक्तपणा जाणवू लागताे. जास्त पाणी सेवन केल्याने त्वचा साफ हाेते आणि चमकदार हाेते. त्यासाठी गरजेचे आहे की राेज भरपूर पाणी प्यावे. अन्न पचविण्यात पाणी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. हे पाेटाच्या इतर समस्या जसे अ‍ॅसिडिटी, बद्धकाेष्ठ आणि गॅसपासून वाचविते आणि शरीरातील विषारी द्रव्यही बाहेर टाकण्यास मदत करते. त्यासाठी राेज स्वच्छ पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.