इंग्लंडमधील वनस्पती अध्ययन केंद्र राॅयल बाेटॅनिकल गार्डनमधील माकडाची भली माेठी प्रतिकृती पाहून पर्यटक थ्नक हाेतात. गार्डनच्या इन्वेरा लिथ हाऊसवर ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध कलाकार लिसा राेएट यांनी ही 45 फूट उंचीची माकडाची प्रतिकृती तयार केली आहे. चपट्या नाकाची ही साेनेरी माकडे नामशेष हाेण्याच्या मार्गावर असल्यामुळे इंटरनॅशनल युनियन फाॅर कंझर्व्हेशन ऑफ नेचर या संस्थेने जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी ही प्रतिकृती केली आहे. लिसा राेएट यांनी ही सुंदर कलाकृती तयार केली असून, यापूर्वी त्यांनी चीन, हाँगकाँग नेदरलँड व ऑस्ट्रेलियामध्ये सुध्दा अशा प्रकारच्या कलाकृती तयार केल्या आहेत.