मेंदू म्हणजे आपल्या शरीराचा नियंत्रक. प्रत्येक अवयव महत्त्वाचा असला, तरी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम मेंदूच करत असल्यामुळे ताे सर्वांत माेलाचा असताे. आपण शारीरिक आराेग्याकडे जेवढे लक्ष देताे तेवढे मेंदूच्या आराेग्याकडे देत नाही.शारीरिक वयाेवाढीच्या तुलनेत मेंदू लवकर वृद्ध हाेताे. त्याला कार्यक्षम ठेवण्यासाठी काही साधे उपाय आहेत.दैनंदिन जीवनात विचार करणे, आठवणी ठेवणे, याेजनांची आखणी आणि अंमलबजावणी आदी कामे करणाऱ्या मेंदूचे आराेग्य चांगलेच ठेवायला हवे.
जेमतेम 200 ग्रॅम वजनाच्या या अवयवाला त्याचे काम करण्यासाठी एकूण शारीरिक ऊर्जेपैकी वीस टक्के ऊर्जा आवश्यक असते. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ने (एनआयएच) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातील माहितीनुसार, वयाच्या 40व्या वर्षांनंतर दर दहा वर्षांनी; म्हणजे एका दशकात मेंदूचा आकार (व्हाॅल्यूम) पाच टक्के या वेगाने कमी हाेऊ लागताे आणि वयाच्या 60व्या वर्षांनंतर हा वेग आणखी वाढताे. मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात वयाच्या 40व्या वर्षांनंतर दर वर्षी 0.3- 0.5 ट्न्नयांनी घट हाेऊ लागते, असे या अहवालात म्हटले आहे.
वाढत्या वयाचा मेंदूवर प्रभाव : आपले वय जसे वाढत जाते, तसा मेंदू आक्रसायला लागताे आणि त्याचा आकार कमी हाेऊ लागताे. विशेषत: ‘फ्रंटल काॅर्टे्नस’मध्ये हे प्रमाण जास्त असते. त्यामुळे व्यक्तीची स्मृती कमी हाेऊ लागून सर्व पातळ्यांवर परिणाम हाेऊ लागताे.
ब्रेन मास : ‘फ्रंटल लाेब’ आणि ‘हिप्पाेकॅम्पस’मध्ये आकुंचन हाेऊ लागते. वस्तू ओळखणे, वस्तू आणि व्यक्तींची नावे लक्षात ठेवणे, नव्या आठवणी संग्रहित करणे आणि संज्ञानात्मक कामे हे दाेन विभाग करतात.
कार्टिकल डेन्सिटी : यात ‘सिनेप्टिक कने्नशन’ कमी हाेऊ लागल्याने मेंदूवरील बाह्य आवरण पातळ हाेऊ लागून स्मृती कमकुवत हाेते. एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडताे आणि ‘डिप्रेसिव्ह इलनेस’ची जाेखीम वाढते.
व्हाइट मॅटर : ‘मालिनेट नर्व्ह फायबर’पासून ‘व्हाइट मॅटर’ तयार हाेताे. मेंदूतील नसांमध्ये असलेल्या पेशींना याद्वारे संकेत दिले जातात. वाढत्या वयानुसार ‘मायलिन’ आक्रसत असल्याने प्रक्रिया (प्राेसेसिंग) आणि संज्ञानात्मक वागणुकीवर परिणाम हाेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
न्यूराेट्रान्समीटर सिस्टीम्स : वाढत्या वयानुसार मेंदूद्वारे निर्माण केल्या जाणाऱ्या ‘केमिक मेसेंजर्स’मध्ये कमतरता येते. डाेपामाइन, अॅसिटिलकाेलिन, सेरेटाेनिन आणि नारएपिनेफ्रिन या संप्रेकरांची कामे कमी हाेऊ लागतात. त्याचा परिणाम स्मृती आणि बुद्धीने करण्याच्या कामांवर हाेताे. प्राैढ वयाच्या प्रत्येक दशकापासून डाेपामिनची पातळी दहा टक्के घटते.
याचे संकेत काय असतात? : आपला मेंदू वृद्ध हाेऊ लागल्यावर त्याला अनेक कामे करण्यात अडचणी येऊ लागत असल्याचे ‘द जर्नल ऑफ न्यूराेसायन्सेस’ या नियतकालिकातील ‘ब्रेन एजिंग’ या लेखात म्हटले आहे. काय अडचणी येतात ते पाहा.
ड्रायव्हिंग करताना समस्या येणे.
नवी कामे शिकताना समस्या येणे.
वेळ आणि स्थानाबाबत संभ्रमित हाेणे.
लक्ष एकाग्र करण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडणे.
नव्या गाेष्टी प्राेसेस करताना अधिक वेळ लागणे.
नुकत्याच घडून गेलेल्या घटनांची आठवण न करता येणे.
पूर्वीप्रमाणे नावे आणि फाेननंबर लक्षात न राहणे.
आवडता पदार्थ कसा तयार करावा याची कृती (रेसिपी) विसरणे.
एका वेळी एकापेक्षा जास्त कामे करण्यात अडचणी येणे.
मेंदूची कार्यक्षमता घटविणारी कारणे
वाढते वय : मेंदूतील पेशींना सुरक्षित ठेवणाऱ्या संप्रेरके आणि प्रथिनांचे प्रमाण वाढत्या वयानुसार कमी हाेते. मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह मंदावताे, नवे न्यूराॅन तयार हाेण्याची प्रक्रियाही मंदावते. वयाच्या 60व्या वर्षांनंतर सर्वसाधारणपणे 40 टक्के लाेकांना विस्मृतीचा विकार हाेताे.
अपुरी झाेप : पुरेशी झाेप न घेतल्यामुळे मेंदूच्या विचार, सृजनशीलता आणि समस्या साेडविण्याच्या क्षमतेवर परिणाम हाेताे. निद्रानाशामुळे स्मृतीसुद्धा कमकुवत हाेते. आपण गाढ झाेपेच्या स्थितीत असताना मेंदूत स्मृती बनण्याची प्रक्रिया हाेते. हार्वर्ड विद्यापीठातील संशाेधनानुसार, मॅग्नेशियमची थाेडी कमतरतासुद्धा मेंदूला झाेपेपासून राेखते.
आत्यंतिक मानसिक तणाव : अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’च्या म्हणण्यानुसार, सततच्या तणावामुळे मेंदू कमकुवत हाेऊन त्याच्या रचनेत बदल हाेतात.
=गॅजेट्सचा अतिवापर : दर राेज सात तासांपेक्षा जास्त वेळ गॅजेट्स वापरणाऱ्यांचा मेंदू विकारग्रस्त हाेत असल्याचे दक्षिण काेरियाची राजधानी साेलमधील एका अभ्यासातून समाेर आले आहे. त्यातून ‘डिजिटल डिमेन्शिया’ची जाेखीम वाढते.मेंदूला झालेल्या जखमेएवढा किंवा मनाेविकारांएवढे दुष्परिणाम गॅजेट्सच्या अतिवापरामुळे हाेत असल्याचेही दिसले आहे. याशिवाय, बी-12 आणि डी या जीवनसत्त्वांची कमतरता, ब्रेन ट्यूमर, संसर्ग किंवा रक्तवाहिन्यांचे विकारसुद्धा मानसिक आराेग्यावर परिणाम करतात. नशिल्या अथवा अमली पदार्थांच्या सेवनाचा गंभीर परिणाम मेंदूवर हाेताे.