महिलांसाठी आवश्यक असलेल्या आराेग्य चाचण्या

    22-Sep-2023
Total Views |
 

female 
स्तनांचा एक्स रे : अर्थात चरााेसीरा.चाळीशीनंतर दरवर्षी एकदा करावयाची ही टेस्ट आहे.
 
पैपी स्पीअर टेस्ट : गर्भाशयासंबंधित कॅन्सरचे निदान हाेण्यासाठीची ही आवश्यक चाचणी आहे.वयाच्या 21 व्या वर्षीपासून दर तीन वर्षांतून एकदा करावयाची ही चाचणी आहे.
 
बाेन डेन्सीटी टेस्ट : चाळीशीनंतर ही टेस्ट करावी. हाडांतील कॅलशियमचे प्रमाण सम जण्यासाठीही आवश्यक असते.
 
बीपी टेस्ट : पूर्वी चाळीशीनंतर बीपी तपासले जाई पण आता लहान वयातच हाय बीपी आणि लाे बीपीचे त्रास मुलींना हाेत आहेत. याचा विचारकरता, बीपी तपासून घेणे केव्हांही चांगलेच.
 
डायबेटीससाठी टेस्ट : डायबेटीससाठी दर वर्षातून एकदा रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे आवश्यक असते. जर घरात डायबेटीस आनुवंशिक असेल तर घरातील मुलामुलींची वयाच्या 25 व्या वर्षांपासूनच ही टेस्ट करून घ्या.
 
काेलेस्टेराॅल चाचणी : ही तपासणी वर्षातून एकदा व अगदी तरुण वयातच म्हणजे पंचविशीपासून केल्यास उत्तम असते.
 
पूर्ण रक्तपेशी तपासणी : हिमाेग्लाेबिन व रक्तपेशीसाठी वर्षातून एकदा ही चाचणी आवश्यक असते. बायकांमध्ये अपशाळर जास्त करून आढळत असल्याने ही टेस्ट देखील लवकर सुरुकरणे ायदेशीर ठरते.
 
वजन तपासणी : बायकांनी आपले वजन कायम केले पाहिजे. घरात वजनाचा काटा ठेवल्यास सगळ्यांसाठीच ताे ायदेशीर ठरताे.