पार्किन्सन्स म्हणजे नेमके काय ? : जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे आपली मज्जासंस्था कमजाेर हाेत जाते. गाेष्टी नेमक्या कुठे ठेवल्या आहेत हे आपण विसरायला लागलाे किंवा सारख्या जुन्या आठवणी काढून आपण भावनिक हाेऊ लागलाे की आपल्याला असे वाटते की आपण म्हातारे हाेऊ लागले आहाेत पण बऱ्याच वेळा ही काही येऊ घातलेल्या राेगांची देखील लक्षणे असू शकतात.यापैकी एक म्हणजे पार्किन्सन्स आजार हाेय.1817 मध्ये जेम्स पार्किन्सन्स यांनी या आजाराचा शाेध लावला. आज त्यांच्याच नावाने हा आजार ओळखला जाताे. यात शरीराची थरथर हाेऊन स्नायूंची हालचाल अवघड हाेते यात मुख्यत्वे शरीराची एखादी स्थिती एकसारखी ठेवणे अवघड जाते.
कसा आणि का हाेताे पार्किन्सन्स? : मेंदूमधील चेतापेशींद्वारा डाेपामाईन नावाच्या रसायनाचे पुरेसे निर्माण हाेत नाही तेव्हा हा आजार हाेताे. हा आजार हाेण्याकरिता पर्यावरण आणि जनुके हे दाेन्हीही घटक कारणीभूत असतात.सर्वसाधारणपणे, पार्किन्सन्स आजार वय वर्षे 60 व त्याहून अधिक वय असलेल्या व्य्नतींना हाेताे पण त्याहून लहान वयाच्या व्य्नतींनादेखील हाेऊ शकताे. हा आजार स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आढळून येताे.
उपचार : या राेगाचे निदान लवकर हाेणे गरजेचे असते. एकदा निदान झाल्यावर नियमित औषधे घेणे आणि डाॅक्टरांच्या सल्ल्याने िफजियाेथेरेपी, ऑक्यूपेश्नल थेरेपी चालू करता येतात. हा आजार अगदी गंभीर अवस्थेत असेल तर Deep brain stimulation operationकेले जाते. वाणी आणि भाषा उपचार देखील काही रुग्णांना द्यावे लागतात.
आहार : आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त राखावे. जास्तीत जास्त पाणी पिणे, जेवणातील मिठाचे प्रमाण वाढवणे, लाे बीपीची समस्या टाळण्यासाठी थाेडा थाेडा वेळाने खाणे, आणि वजनात खूप कमी जास्त फरक पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. पार्किन्सन्स या आजाराला आजतरी कुठलाही उपाय सापडलेला नाही.