भरपूर पैसा आणि प्रतिष्ठा म्हणजे सुख-समाधान नाही

21 Sep 2023 08:38:04
 
 


Happy
 
 
 
समाधानी आणि सुखी-आनंदी कसे राहावे या प्रश्नाचे उत्तर आपल्या मानसिक आराेग्यावर अवलंबून आहे. काेणाच्या दृष्टीने पैसे, संपत्ती, गाड्या हा त्याचा निकष असेल, तर गरजा भागून थाेडी चैन करता येईल एवढा पैसा पुरेसा आहे असा दुसऱ्याचा मापदंड असू शकताे. साहजिकच या प्रश्नाचे ठाम असे उत्तर नाही. वास्तवात पाहिले, तर हा प्रश्न द्विधा मन:स्थितीत टाकणारा असल्याने त्याचे याेग्य उत्तर मिळाले नाही, तर मानसिक आराेग्य बिघडते. आपण एखादी व्यक्ती समाधानी असल्याचे म्हणताे तेव्हा त्यामागे त्याचे काही सामाजिक मापदंड आपण बघत असताे. उदा. माेठे घर, पद आणि माेटार आदी.यश, तारुण्य, आकर्षण, रूबाब आणि पैसा हे आपल्या सुख-समाधानाचे निकष असल्याची समजूत काेणी टाळू शकत नाही.मात्र, हे सगळे म्हणजे यशस्वी आयुष्य नसते ही वस्तुस्थितीसुद्धा समजून घेतली पाहिजे. हे भ्रम तुटायला लागल्यावर मानसिक आराेग्य बिघडते आणि मनाेविकारांतून नैराश्य- औदासीन्य तीव्र हाेऊन त्यावरील उपचारांचा खर्च वाढत जाताे. या उपचारांमुळे तात्पुरता दिलासा लाभत असला, तरी मूळ समस्या कायम राहते.
 
पायाभूत सिद्धांत : यश आणि समाधानाबाबत भ्रमनिरास झाल्यावर मनाेविकार उद्भवू लागतात आणि काही वेळा ते ‘सिझाेफ्रेनिया’च्या पातळीपर्यंतही पाेहाेचू शकतात.मनाेविकारांवर उपचारांसाठी विकसित करण्यात आलेली पद्धत पुरेशी प्रभावी नाही. काेणतेही आनुवंशिक कारण, कुटुंबाचा पूर्वेतिहास किंवा संबंधित व्यक्तीच्या आराेग्याचा इतिहास असा काेणताही घटक एखाद्या व्यक्तीच्या मानसिक असंतुलनाचे स्पष्ट वर्णन करू शकत नाही. या लक्षणांपासून आराम देणारी काही औषधे सध्या वापरली जातात. पण, ही स्थिती येऊ नये म्हणून एक मार्ग आहे. त्यामुळे सुख-दु:ख, तणाव आणि चांगल्या मानसिक आराेग्याबाबत विचार करता येताे. हे सगळे घटक परस्परविराेधी असल्याने त्यांचा एकत्र विचार करावा लागताे. त्यासाठी आपल्याला औषधांद्वारे उपचारांपेक्षा पुढे जाऊन आपले ऋषी-मुनी आणि आध्यात्मिक गुरू काय म्हणतात याचा विचार केला पाहिजे आणि साेबत प्राचीन संस्कृतीचा विचारही.
 
बदलांच्या सर्व टप्प्यांत हे नियम अनेक शतके तसेच आहेत आणि ते दु:ख व कष्टांमधून मार्ग काढण्याबाबत मार्गदर्शन करतात. मात्र, त्यात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पातळीवर भिन्नता आहे. जसे, बाैद्ध धर्माचा मध्यम मार्ग अद्वैत वेदान्तापेक्षा वेगळा आहे आणि हे दाेन्ही ख्रिस्ती धर्माच्या परंपरेपेक्षा वेगळे आहेत. आजच्या काळातील आधुकि समाजात या भिन्नता लुप्त झाल्या आहेत किंवा धार्मिक कट्टरतेबराेबर जुळल्या आहेत. मानसिक आराेग्य बिघडण्याचे हे एक कारण आहे. सदैव प्रसन्न, आनंदी कसे राहावे हे डाॅ्नटरसुद्धा सांगू शकत नाहीत.ते औषधांद्वारे उपाय करतात आणि ताे त्या वेळी हाेत असलेल्या त्रासावर मात करण्याचा तात्पुरता मार्ग असताे.
सामाजिक मान्यतांनुसार तुम्हीसुद्धा आपले मानसिक आराेग्य सुधारण्याच्या प्रयत्नांत असाल, तर तुम्हाला कायमस्वरूपी उपायसापडणार नाही. परंपरेने चालत आलेल्या बंधनांत अडकलेल्या मेंदूला वेगळा विचार करणे त्यासाठी आवश्यक आहे.पण, आपला मेंदू भाैतिक प्रगतीतच अडकून पडलेला असणे हा विराेधाभास आहे आणि मानसिक जगातील वास्तव आपल्याला माहीत नाही. आपला मेंदू किती मर्यादेपर्यंत समस्या निर्माण करू शकताे आणि मनाेविकार किती शक्तिशाली असतात याची कल्पना आपल्याला नाही.
Powered By Sangraha 9.0