ग्राहक सेवेत सुलभता आणण्याच्या ध्येयाने कार्यरत राहा

18 Sep 2023 15:47:38
 
custo
 
 
पुणे, 17 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यात सहजता व सुलभता आणण्याचे काम मुख्यत्वे अभियंते करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज महावितरणनेही ग्राहकांना इज ऑफ लिव्हिंगप्रमाणे सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. या सेवेतील सहजता, सुलभता अबाधित ठेवण्याच्या व वाढवण्याच्या ध्येयाने कार्यरत राहा, असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले. राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त रास्ता पेठेतील प्रकाशदूत सभागृहात आयोजित कार्यक्रमात पवार यांच्या हस्ते पुणे परिमंडलातील उत्कृष्ट 25 अभियंत्यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला.
 
अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) माधुरी राऊत, कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील आदींसह सर्व विभागीय कार्यालय प्रमुख, कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी आदी उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरी करणारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप मदने, अशोक जाधव, सुधीर पण्णीकर, संजय मालपे, विश्वास भोसले, प्रमोद गायकवाड, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी, मुकेश जोशी, अभिजित देशपांडे, विजय गारगोटे, अमित शिंदे, निताशा धामणगी, सहायक अभियंता रत्नदीप काळे, रणजित वाघ, शुभांगी क्षीरसागर, पूजा नायडू, श्रृती रोडे, चेतन टिकले, हर्षद कुलकर्णी, सुप्रिया जोशी, विजय माने, मंगेश सोनवणे, रोहिणी उगिले, हाजीमलंग बागवान, संतोष शिंदे यांचा गौरव करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0