उत्तम संधी मिळत असेल किंवा सध्याच्या जाॅबमध्ये प्रगतीची संधी दिसत नसेल, तरच नाेकरी बदलली जाते. मात्र, नव्या जागी काम सुरू करणे प्रारंभीच्या काही काळात कठीण असते. आधीच्या ठिकाणी असलेली कामाची पद्धत नव्या जागी बदलावी लागते, नव्या सहकाऱ्यांबराेबर जुळवून घ्यावे लागते आणि अन्य काही तडजाेडीसुद्धा कराव्या लागतात. नवी नाेकरी म्हणजे नवा प्रारंभ असल्याने उत्सुकतेबराेबरच चिंतासुद्धा येते.मात्र, यावर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या या दहा टिप्स तुम्हाला उपयाेगी पडतील.
1) तयारी सर्वांत महत्त्वाची : तुम्ही नवी नाेकरी स्वीकारली असेल, तर तिची तयारी करणे सर्वांत महत्त्वाचे असते. नव्या नाेकरीवर दाखल हाेण्याच्या पहिल्या दिवसापूर्वी संबंधित कंपनीची माहिती आणि कार्यसंस्कृती जाणून घ्या. आपल्यावर काेणती जबाबदारी साेपविली जाणार आहे याचा अभ्यास करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास नव्या ठिकाणीही कायम राहून जुळवून घेणे सुलभ जाते. आपल्याला पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या आणि नियाे्नत्याची अपेक्षा समजून घेतलीत, तर भीती कमी हाेते.
2) मनाची सकारात्मकता : नव्या नाेकरीत रुजू हाेताना मनात सकारात्मक भावना आणि विचार असणे याेग्य ठरते. आपले तेथे कसे हाेईल असा नकारात्मक विचार न करता सगळे चांगले हाेईल असा आशादायी विचार करावा. आपल्यातील काैशल्ये दाखविण्याची ही नवी संधी असल्याचा विचार केलात, तर मनातील भीती दूर हाेते. नव्या नाेकरीतील आव्हाने स्वीकारण्यासाठी स्वत:ला तयार करा. त्याचा फायदा तुम्हाला मिळेल.
3) यशाची कल्पना : नव्या नाेकरीत रुजू झाल्यावर काय हाेईल याचा विचार करणे चांगले. त्यासाठी डाेळे बंद करा आणि आपण नव्या नाेकरीवर रुजू झाल्यावर काय करणार आहाेत याची कल्पना करा. तुम्ही सहकाऱ्यांबराेबर बाेलत आहात, एखादे आव्हानात्मक काम करत आहात आदी कल्पना त्यात असाव्यात. या तंत्रामुळे नव्यनाेकरीत रूळण्याची तुमच्या मनाची तयारी हाेते तसेच भीतीसुद्धा जाते.
4) नियाेजन : नवी नाेकरी आणि नवी जबाबदारी साेपी नसल्याने नियाेजन करावयास हवे. तेथे आपला दैनंदिन कामांचा क्रम कसा असेल, काय करावे लागेल आणि आपली उद्दिष्टे काय, याचे नियाेजन करा. तुमचे हे नियाेजन पक्के आणि स्पष्ट असेल, तर नव्या नाेकरीत तुम्हाला ताण येणार नाही. शिवाय तुमचा आत्मविश्वास वाढताे.
5) सजगता आणि रिलॅ्नसेशन : नव्या नाेकरीत दाखल झाल्यावर काही काळ थाेडा ताण असणे साहजिक असते. त्यावर मात करण्यासाठी सजगता आणि रिलॅ्नसेशनचे तंत्र वापरले पाहिजे. खाेल श्वास घेणे, ध्यान करणे आणि याेग यांच्यामुळे तुमच्या नसा शिथिल हाेऊन तणाव दूर हाेताे. सजगतेच्या अभ्यासामुळे नव्या जबाबदाऱ्या पेलताना चिंता कमी हाेते.
6) हास्य आणि आत्मविश्वास : तुम्ही नव्या नाेकरीच्या जागी पाेहाेचताच, तुमची बाॅडी लँग्वेज खूप काही सांगते. नाेकरीच्या जागी गेल्यावर नव्या सहकाऱ्यांकडे पाहून तुम्ही केलेले माेकळे हास्य तणाव दूर करते. हास्यामुळे आपुलकी निर्माण हाेते. खाेटे हास्य मात्र टाळा. हास्यामुळे तुमचा स्वभाव कळताे. नव्या जागी दाखल हाेताना आत्मविश्वासाने पावले टाका. तुमच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि हास्यामुळे नवीन सहकारीसुद्धा खूश हाेतात आणि तुम्ही तेथे लवकर रूळता.
7) सुयाेग्य पाेशाख : कामाच्या जागी याेग्य ठरणारा पाेशाख हवाच; पण ताे तुम्हाला याेग्य दिसणारासुद्धा असणे महत्त्वाचे असते. नव्या कंपनीत ड्रेस काेड काय आहे हे आधी जाणून घेऊन त्यानुसार कपडे वापरा. आरामदायी कपड्यांमुळे आत्मविश्वास वाढताे.
आपल्याला काेणते कपडे चांगले ठरतात हे आधी जाणून घ्या आणि मगच ते वापरा. सुयाेग्य कपड्यांतील व्यक्तीची लगचे छाप पडते.
8) दृढ संबंध : नेटवर्किंग हा नव्या जागी दृढ संबंध निर्माण करण्याचा एक चांगला मार्ग असताे. नव्या जागी दाखल झाल्यावर नव्या सहकाऱ्यांबराेबर ओळख करून घ्या, माहिती घ्या.त्यांच्याबराेबर संवाद ठेवा. त्यातून संबंध घनिष्ट हाेत जाऊन तुम्ही त्यांच्यातील एक हाेता. गरजेच्या वेळी तुम्हाला आधार मिळताे आणि इतरांबाबत तुम्ही तेच करता.
9) वास्तववादी अपेक्षा : नव्या जागी दाखल झाल्यावर अवास्तव अपेक्षा न ठेवता वास्तवात राहा. पहिल्या दिवशी काय करावे हा प्रश्न असताना मदत घ्या. काही नवीन काम शिकावे लागणार असेल, तर ते शिका आणि संयम ठेवा. आपल्या कामाबाबत फिडबॅक घ्या आणि त्यातून सुधारणा करा. प्रगतीसाठी असे करणे चांगले ठरते.
10) छाेट्या यशाचा आनंद : नव्या जागी एखादे काम चांगले केल्यानंतर त्या यशाचा आनंद घ्या. त्यात तुमच्या सहकाऱ्यांनासुद्धा सहभागी करा. यातून चांगला संदेश जाताे आणि तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढताे.नव्या नाेकरीत रुजू हाेताना भीती वाटणे साहजिक असल्याने त्याची काळजी करू नका. या टिप्स वापरल्यात, तर तुम्हाला ताण जाणवणार नाहीत.