चहा, जाे ताण घालवेल, थकवा दूर

    15-Sep-2023
Total Views |
 
 

tea 
 
हल्ली बाजारात ताण कमी करणारा ग्रीन टी आला आहे. यात वेगवेगळ्या ुलांपासून बनवलेल्या चहाचं प्रमाण माेठं आहे. जाणून घेऊयात त्याविषयी...
 
चॅमाॅमाईल ग्रीन टी : विशिष्ट प्रकारच्या ुलांचा हा चहा असताे.अनेक देशांमध्ये या ुलांचा औषधी उपयाेग आहे. चॅमाॅमाईल ग्रीन टी निद्रानाशावर उत्तम आहे. या चहाला विशिष्ट प्रकारचा सुगंध असताे.निद्रानाशाबराेबरच चिडचिड कमी करण्यासाठी देखील हा चहा मदत करताे.
 
वालेरिअन ग्रीन टी : वालेरिअन ही ुलांची प्रजाती युराेप आणि आशिया खंडात आढळते. या झाडांना पांढरी किंवा गुलाबी छाेटी ुलं येतात. या ुलांचा वापर अत्तर बनवण्यासाठी केला जाताे. पण सध्या ुलांच्या मुळांचा उपयाेग करून त्यांपासून चहा बनवला जाताे. या मुळांमध्ये वेदनाशामक गुण आहेत.मानसिक तसेच शारीरिक थकवा दूर करण्यासाठी हचहा उत्तम असल्याचं म्हटलं जातं.
 
पॅशन फ्लाॅवर ग्रीन टी : आपल्या इथे कृष्णकमळ ुलतात, त्यांचाच हा एक प्रकार आहे. स्थानिक अमेरिकन लाेकं या ुलांचा औषधी उपयाेग करतात. रात्री झाेपण्यापूर्वी या ुलांपासून बनवलेला चहा घेतला तर शांत झाेप लागते, शांत झाेपेमुळे परिणामी मनावरचा ताण ही हळूहळू कमी हाेताे.
 
लव्हेंडर ग्रीन टी : लव्हेंडर ुलांचा उपयाेग अनेक साैंदर्य प्रसाधनांमध्ये देखील केला जाताे. ही ुलं सुगंधी तर असतातच, त्याचबराेबर या ुलांना आकर्षक असा रंग देखील असताे. हा चहा पाेटाच्या वातासाठी उपयुक्त आहे. हा चहा निद्रानाशावर उत्तम आहे. त्याचप्रमाणे स्नायूंचं दुखणं देखील हा चहा कमी करताे. चिडचिड कमी करून तणाव हलका करण्यासाठी देखील हा चहा उत्तम आहे.
 
लेमन बाम ग्रीन टी : लेमन बाम हा पुदिन्याचा एक प्रकार आहे.पचनशक्ती सुधारणं, अस्वस्थता दूर करणं, तणाव हलका करणं, डाेकेदुखी यांवर हा चहा उत्तम आहे.