एखाद्या तरुणीने विवाहाचा प्रस्ताव स्वीकारणे हा प्रत्येक तरुणाच्या आयुष्यातील माैल्यवान क्षण असताे. ताे अविस्मरणीय व्हावा यासाठी परदेशातील तरुण-तरुणीला वेगवेगळ्या प्रकारे प्रपाेज करतात. एकाने न्यूझीलंडच्या ऑकलंड विमानतळावर त्याच्या प्रेयसीला चक्क अनाउन्समेंट करून प्रपाेज केले.हा तरुण भारतीय आहे. त्याचे नाव यशराज छाबरा असून, त्याच्या प्रेयसीचे नाव रिया शु्नला आहे. ती ऑकलंडमध्ये प्राेजे्नट मॅनेजर आहे, तर यशराज छाबरा बँकिंगतज्ज्ञ आहे. मेलबर्न फ्लाइट बुक करताना त्याने रियाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रपाेज करण्याचा निर्णय घेतला व ऑकलंड विमानतळावरील अधिकाऱ्यांना विनंती केली.
आश्चर्याची बाब म्हणजे अधिकाऱ्यांनी ती लगेच मान्य केली. रिया शु्नला विमानतळावर पाेहाेचली, मात्र ती बॅग घरीच विसरली. त्यावेळी तिच्या आईचा फाेन आला की, रिया बाहेर ये, तुला काेणीतरी भेटायला येत आहे. ती विमानतळातून बाहेर आली. त्यावेळी यशराज छाबरा गुडघ्यावर बसून प्रपाेज करित असल्याचे दिसले.यशराजच्या मागे त्याचे मित्र ‘विल यू मॅरी मी’ असे पाेस्टर घेऊन उभे हाेते. उद्घाेषक तिच्या कक्षेत बसून या प्रपाेज कार्यक्रमाची घाेषणा करीत हाेती.