विकासाचे फायदे मिळत असले, तरी ताेटेही सहन करावे लागतात. त्यात एक आहे प्रदूषणाचा. कारखाने, वाहने आणि अन्य घटकांमुळे जगभरातील हवा प्रदूषित हाेत चालली असून, त्याचा घातक परिणाम मानवी आराेग्यावर हाेत आहे. प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसत असलेल्या देशांच्या यादीत बांगलादेश अव्वल असून, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.शिकागाे विद्यापीठातील ‘एनर्जी पाॅलिसी इन्स्टिट्यूट’ने जारी केलेल्या ‘एअर क्वालिटी लाइफ इंडे्नस’नुसार (ए्नयूएलआय) हवेच्या प्रदूषणामुळे सर्वसाधारण भारतीयांचे आयुष्य 5.3 वर्षांनी घटत आहे. ‘जगातील सर्वांत प्रदूषित शहर’ अशी ओळख असलेल्या राजधानी नवी दिल्लीत तर स्थिती अधिक वाईट असून, प्रदूषणामुळे तेथील नागरिकांचे आयुष्य 11.9 वर्षांनी घटत असल्याचे या अभ्यासात दिसले.
प्रदूषित देशांच्या यादीत बांगलादेश प्रथम असून, तेथील नागरिकांचे सर्वसाधारण आयुष्य 6.8 वर्षांनी घटत आहे. या यादीत भारत दुसऱ्या, नेपाळ तिसऱ्या, पाकिस्तान चाैथ्या आणि मंगाेलिया पाचव्या क्रमांकांवर आहेत.या प्रदूषणाबाबत ‘ए्नयूएलआय’ तयार करण्यात आला आहे. पीएम2.5 (फाइन पर्टि्नयुलर मॅटर) बाबत जागतिक आराेग्य संघटनेने निश्चित केलेल्या मापदंडांनुसार हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. भारतातील अनेक शहरांत प्रदूषणामुळे मानवी आयुर्मान घटत असल्याचे दिसते.त्यात गुडगाव (11.2 वर्षे), फरिदाबाद (10.8 वर्षे), जाैनपूर (10.1 वर्षे), लखनाै आणि कानपूर (प्रत्येकी 9.7 वर्षे) आणि पाटणा (8.7 वर्षे) असे प्रमाण आहे.
भारतीयांसाठी कणांद्वारे हाेणारे प्रदूषण (पार्टि्नयुलेट पाेल्युशन) हा सर्वांत माेठा धाेका असून, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित विकारांमुळे (कार्डिओव्हस््नयुलर डिसीजेस) भारतीयांचे आयुष्य सरासरी 4.5 वर्षांनी घटत असल्याचे अभ्यासात दिसून आले.‘पीएम2.5मुळे जागतिक आयुर्मर्यादेवर गंभीर परिणाम हाेतात. त्यात धूम्रपान, मद्यपानाच्या तिप्पट तसेच माेटारअपघातांच्या तुलनेत पाच पट आणि एचआयव्ही-एड्सच्या तुलनेत सात पट हा धाेका संभवताे,’ असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. बांगलादेश, भारत, पाकिस्तान, चीन, नायजेरिया आणि इंडाेनेशिया या देशांमध्ये हवेचे प्रदूषण सर्वांत जास्त असल्याने येथील नागरिकांचेआयुर्मान एक ते सहा वर्षांनी घटत असल्याचे मायकेल ग्रीनस्टाेन या तज्ज्ञाने सांगितले.प्रदूषण कमी करण्याच्या मुद्द्यावर चीनने प्रगती केली असून, तेथील हवेची गुणवत्ता थाेडी सुधारली आहे.2013मध्ये तेथील नागरिकांच्या आयुष्यात प्रदूषणामुळे हाेत असलेली 4.7 वर्षांची घट आता 2.5 वर्षांवर आल्याचे त्यांनी सांगितले.