आपले काैटुंबिक जीवन आनंदी राहायचे असेल तर आपण कुटुंबीयांसाठी अधिक वेळ खर्च केला पाहिजे.आपल्यापैकी अनेक जण याच गाेष्टीकडे दुर्लक्ष करीत असतात. फक्त स्वत:कडे लक्ष देणारे लाेक आपल्या कुटुंबाकडे सरळसरळ दुर्लक्ष करत असतात.आपल्या कुटुंबीयांना ते गृहीत धरत असतात. स्वत:चे मित्र, उद्याेग, व्यवसाय, पार्ट्या, समारंभ यांच्या नादात ते आपल्याला बायका-मुले आहेत हेच विसरून जातात. त्यामुळे मुले, पत्नी यांच्याशी आपण भावनिकरीत्या जाेडले जात नाही. कुटुंबीयांनाही आपल्याबद्दल ममत्व, आपुलकी, जिव्हाळा वाटेनासा हाेताे.उद्याेग-व्यवसायात आपण आपल्या कुटुंबीयांना वेळ देऊ शकत नाही.
कुटुंबीयांबराेबर घरगुती समारंभांमध्ये घालवलेले क्षण आपल्या मनाला प्रसन्नता देतात.
बारीकसारीक क्षणांचा परिणाम आपले मानसिक आराेग्य सुदृढ हाेण्यात हाेताे. त्यामुळेच कुटुंबीयांबराेबरही वेळ घालविला पाहिजे. अगदी छाेट्या छाेट्या गाेष्टींद्वारे आपण कुटुंबीयांसाठी बरेच काही करू शकताे. आपल्या मुलांना त्यांचा गृहपाठ करण्याला मदत करा.आपले वडील आपल्याला मदत करत आहेत, याचे मुलांना माेठे अप्रूप वाटते. असे केल्यास मुले तुमच्याशी माेकळेपणे बाेलू लागतात. याचा परिणाम तुमचे मुलांबराेबरचे संबंध घट्ट हाेण्यात हाेताे. मुलांना अचानक ट्रीपला घेऊन जा. मुलांच्यावाढदिवसादिवशी सरप्राईझ पार्टीचे आयाेजन करा.ट्रीपला गेल्यावर मुलांबराेबर एकाच टेबलवर जेवायला बसा.
आपल्या मुलांना एखादा छंद असेल तर त्यासाठी करता येईल तेवढी मदत करा. मुलांशी, बायकाेशी दिवसातून 5/10 मिनिटे तरी गप्पा मारा.‘‘तू आज दिवसभर काय केलेस’’, ‘‘उद्या काय करणार आहेस’’, ‘‘परीक्षा केव्हा आहे’’, आदी विषयांवर मुलांशी गप्पा मारल्या तर मुलांनाही आनंद मिळताे.8/15 दिवसांनी कुटुंबीयांबराेबर एखादी छाेटी ट्रीप केली तर त्यामुळे मुलांना जाे आनंद मिळताे, त्याची माेजदाद करता येणार नाही. आपले वडील आपल्याकरिता वेळ देत आहेत, ट्रीपला येत आहेत याचा मुलांना माेठा आनंद मिळत असताे. असा छाेटा छाेटा वेळ कुटुंबीयांबराेबर घालवल्याने त्यामुळे मिळणारा मानसिक आनंद माेठा असताे.या मार्गांनी कुटुंबीयांशी साधलेला संवाद आपले मानसिक आराेग्य चांगले राहण्यास मदत करीत असताे.