आयुष्मान भव’त उत्कृष्ट काम करून दाखवू

    15-Sep-2023
Total Views |
 
 

CM 
 
आपल्याकडे निराेगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव’ असा आशीर्वाद दिला जाताे. या भावनेतून देशवासीयांच्या निराेगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ माेहिमेची सुरुवात राज्यभर करणार आहाेत. या माेहिमेत महाराष्ट्र देशात उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आराेग्यसेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.देशात ‘आयुष्मान भव’ माेहिमेस सुरुवात झाली असून, राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी देशपातळीवर या माेहिमेचा प्रारंभ केला. यावेळी राज्याच्या माेहिमेचा प्रारंभ सह्याद्री अतिथीगृहात राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बाेलत हाेते.आराेग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यावेळी उपस्थित हाेते.
 
राष्ट्रीय क्षयराेग दुरीकरण कार्यक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या निक्षय मित्र व जिल्ह्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाैरवण्यात आले. तसेच, महात्मा जाेतिराव फुले जन आराेग्य याेजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आराेग्य या एकत्रित याेजनेच्या कार्ड वाटपास सुरुवात करण्यात आली. राज्यात या याेजनेचे 2 काेटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे. या समारंभात आराेग्य आधार अ‍ॅप, महाराष्ट्र नर्सिंग हाेम रजिस्ट्रेशन अ‍ॅप, तसेच राज्यातील आराेग्यवर्धिनी केंद्रातील अधिकाऱ्यांसाठीचे समुदाय आराेग्य अधिकारी अ‍ॅपचा प्रारंभ करण्यात आला.अवयव दान हे सर्वांत माेठे आणि पुण्याचे कार्य आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की आयुष्मानबाबत आयाेजिण्यात येणाऱ्या ग्रामसभांमध्ये याविषयी जागृती करण्यात यावी.क्षयरुग्णांना पाेषण आहार देण्यासाठी ‘निक्षय मित्र’ बनवणे हा उपक्रमही राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आराेग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.