बचतीद्वारे संपत्ती निर्माण करा

    14-Sep-2023
Total Views |
 
 
savings
 
आपण नाेकरी करत असाल अथवा व्यवसाय करत असाल तर आपण उत्पन्न आणि संपत्ती यातील फरक ओळखला पाहिजे. उत्पन्न हे दरमहा मिळणारे असते. त्याकरिता आपल्याला संपत्ती आणि मालमत्ता आणि उत्पन्न यामधील फरक जाणून घेतला पाहिजे.आपल्या उत्पन्नातील ठरावीक भाग दरमहा बाजूला काढून संपत्ती अथवा मालमत्ता निर्माण करू शकताे. घर, शेतजमीन, फ्लॅट, प्लाॅट याला स्थावर मालमत्ता असे म्हणतात. साेने, चांदी, मुलांसाठी उच्च शिक्षणसाठी काढलेले कर्ज ही सुद्धा मालमत्ताच आहे.आपल्याला दरमहा किती उत्पन्न मिळते याचा अंदाज आल्यावर या उत्पन्नाद्वारे मालमत्ता कशी निर्माण करता येईल याचा विचार आपण करायला हवा. मालमत्ता अचानक निर्माण हाेत नाही. त्याकरिता अनेक वर्षांचे नियाेजन करावे लागते.
 
म्हणूनच विविध माध्यमातून आपल्याकडे येणारा पैसा गुंतविला पाहिजे. त्यासाठी शेअर्स, म्युच्युअल ंड याला प्राधान्य द्यायला हवे. बँकेतील मुदत ठेवी सारख्या परंपरागत पद्धतीत आपल्या गुंतवणुकीतून अधिक उत्पन्न, अधिक परतावा मिळत नाही. घरखर्चातून शिल्लक राहिलेली रक्कम आपण विविध मार्गात गुंतवली तर आपल्याला काही दिवसांनी चांगला परतावा मिळू शकताे. त्याचबराेबर आपला आणि आपल्या कुटुंबियांचा विमा उतरवण्यास विसरू नका.सर्वप्रथम स्वत:ला आणि कुटुंबियांना संरक्षित करून घ्या. त्यामुळे आपल्याबाबतीत अशी अनुचित घटना घडणारच नाही असा विचार करू नका. अशी घटना घडल्यास आपल्या कुटुंबीयांचे काय हाेईल असा विचार करून विम्याचे संरक्षण घेतले पाहिजे. विम्यामुळे आपल्या कुटुंबियांच्या आर्थिक गरजा भागू शकतात. त्याचबराेबर आपल्या कर्जावर नियंत्रण असणे गरजेचे असते.
 
सध्या बँका सहज कर्जे द्यायला तयार असतात. मात्र ही कर्जे घेऊन आपल्या डाेक्यावरचा आर्थिक भार किती वाढवायचा याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक गाेष्टीसाठी आपण कर्ज काढू लागलात तर महिन्याच्या खर्चाचे बजेट कर्ज ेडण्यातच संपून जाईल. तसे झाले तर आपल्याला भविष्यातील आर्थिक नियाेजनाच्या दृष्टीने काहीच उपयाेग हाेणार नाही. आपल्या गरजा काही दिवस लांबणीवर टाकल्यास त्या गाेष्टीसाठी कर्ज काढण्याची गरज भासणार नाही.हल्ली सर्व बँकांचे कर्जावरील व्याजाचे दर 15 टक्क्यांच्या पुढे आहेत.अशी गरज आपल्याला कितपत परवडणार आहे याचा विचार कर्ज घ्यायच्या आधी आपण करायला हवा. असा विचार केला तरच आपल्या आर्थिक गरजा आपण पूर्ण करू शकू.